Just For Hearts

Nutrition

TSH वाढलंय? Medicines सोबत Nutrition पण महत्त्वाचं!

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन
TSH वाढलंय? Medicines सोबत Nutrition पण महत्त्वाचं!

तुम्ही मागील post मध्ये Dr Ravindra Kulkarni Sir यांनी TSH वाढल्यावर Thyroid medicines कधी आवश्यक असतात, हे वाचलं असेल.

आता Personalised Nutrition च्या दृष्टिकोनातून याकडे पाहूया!

कारण प्रत्येक व्यक्तीचा आहार, lifestyle आणि nutritional needs वेगवेगळ्या असतात.

1️⃣ Protein पुरेसं मिळतंय का? डाळी, कडधान्यं, दूध, दही, पनीर आणि टोफू यांसारखे protein sources आहारात ठेवा. Thyroid hormones तयार होण्यासाठी आवश्यक amino acids मिळवणं महत्त्वाचं आहे.

2️⃣ Iron आणि Vitamin B12 कडे लक्ष द्या. Iron किंवा Vitamin B12 ची कमतरता असल्यास थकवा, अशक्तपणा आणि केस गळण्यासारखी लक्षणं दिसू शकतात. विशेषतः vegetarian आहार घेणाऱ्यांनी Vitamin B12 च्या कमतरतेच्या जोखमीकडे लक्ष द्यावं.

3️⃣ Selenium, Zinc आणि Vitamin D supplements आवश्यक आहेत का? हे nutrients शरीराच्या विविध कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पण प्रत्येक Thyroid patient ला त्यांचे supplements घेण्याची गरज नसते. आहार, लक्षणं आणि गरजेनुसार तपासण्या करूनच supplements ठरवा. जास्त supplements घेणं फायदेशीरच असेल असं नाही!

4️⃣ Iodine बाबतीत सावध राहा! Iodine thyroid hormones तयार करण्यासाठी आवश्यक आहे. पण अतिरिक्त iodine किंवा काही “Thyroid Support” supplements मुळे thyroid function बिघडू शकतं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय high-dose iodine supplements घेऊ नका.

5️⃣ Thyroid medicine घेताय? हा मुद्दा लक्षात ठेवा! Levothyroxine सोबत Iron आणि Calcium supplements घेतल्यास औषधाचं absorption कमी होऊ शकतं. साधारणपणे 4 तासांचं अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या औषधासाठी योग्य वेळ डॉक्टर किंवा फार्मासिस्टकडून निश्चित करा.

🌿 Personalised Nutrition म्हणजे काय? प्रत्येकाला एकच Thyroid Diet किंवा supplements देणं नव्हे!

✔️ आहारातून पुरेसं पोषण मिळतंय का? ✔️ कोणत्या nutrients ची कमतरता आहे? ✔️ Supplements खरोखर आवश्यक आहेत का? ✔️ Thyroid reports, symptoms आणि lifestyle यांचा एकत्रित विचार केला आहे का?

लक्षात ठेवा: योग्य nutrition thyroid health ला support करू शकतं; पण आवश्यक thyroid medication चा पर्याय नाही. औषध स्वतःहून बंद करू नका किंवा dose बदलू नका.

🦋 TSH च्या एका number पलीकडे जाऊन, आपल्या संपूर्ण nutritional health कडे लक्ष देऊया!

तुम्ही Thyroid साठी कोणते supplements घेता? Comment मध्ये सांगा.

🟢 Thyroid बद्दल काही प्रश्न आहेत? JFH ONE वर WhatsApp करा. तुमचा प्रश्न विचारा; TSH च्या एका number पलीकडे पूर्ण thyroid picture समजून घेऊ.

📲 आणि 19 तारखेपासून आपला App सर्वांसाठी उपलब्ध होईल — awareness आणि tracking साठी.

*Observe the Pattern. Change the Course.*

Divya Sanglikar Sports And Clinical Nutritionist Metabolic Health Coach Team Just for Hearts

#tsh#thyroid#nutrition#protein#iron#vitamin-b12#selenium#iodine
Share:WhatsAppXFacebook