Just For Hearts

Lifestyle

सर… Dr. Dixit Diet करावी का?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

“सर… Dr. Dixit Diet करावी का? दिवसातून दोन वेळा खावे का… काही आहारतज्ञ सांगतात तसे दर दोन तासांनी?”

हा प्रश्न मला खूप वेळा विचारला जातो.

आणि खरं सांगायचं तर हा प्रश्न चुकीचा नाही कारण लोक खरोखर प्रयत्न करत असतात.

आज social media वर अनेक पद्धती दिसतात. Dr. Dixit Diet बद्दल बोललं जातं. Dt. Diwekar Diet बद्दलही चर्चा होते.

लोक sincere असतात. Diet charts follow करतात. Expensive fruits घेतात. Gym memberships घेतात.

पण काही महिन्यांनी तेच लोक परत म्हणतात “सर… काही टिकत नाही.”

25+ वर्षांच्या clinical practice मध्ये मी एक गोष्ट वारंवार पाहिली आहे:

Metabolic health हा फक्त diet चा प्रश्न नाही. Food महत्त्वाचं आहे. Exercise महत्त्वाचं आहे. पण शरीर फक्त plate आणि gym वर चालत नाही.

Metabolism हा खूप मोठा system आहे.

म्हणून मी सहसा diet chart देत नाही, menu plan देत नाही, calorie counting सांगत नाही.

मी बोलतो:

• metabolism बद्दल • insulin rhythm बद्दल • sleep बद्दल • stress बद्दल • daily habits बद्दल • routine बद्दल • relationships बद्दल • caregivers बद्दल • patients stories बद्दल

कारण metabolic disease एका कारणामुळे होत नाही. तो pattern मुळे तयार होतो.

माझी team चा सुद्धा ह्यावर ठाम विश्वास आहे.

Just For Hearts मध्ये माझ्यासोबत नामांकित अनुभवी nutritionists, exercise experts, Ayurveda specialists, Diabetes Educators, Psychologists आणि clinical colleagues काम करतात.

आम्ही सगळे एक गोष्ट मान्य करतो:

Metabolism हा diet / exercise पेक्षा खूप मोठा विषय आहे.

Counselling मदत करते. Understanding मदत करते. Routine मदत करते. Health tracking मदत करते. Technology मदत करते.

मला कोणावर टीका करायची नाही, ना कोणाशी स्पर्धा करायची आहे.

Dixit असो किंवा Diwekar किंवा अजून ही अनेक celebrity coaches असोत, माझं त्यावर काही comment करायचे नाही. लोकांना जे उपयोगी वाटतं ते त्यांनी करावं.

मी बोलतो आहे ज्या गोष्टी सामान्य माणूस मोठा खर्च न करता मोठा effort न करता रोज करू शकतो.

माझा ठाम विश्वास आहे:

Health महाग नसते. Healthcare महाग असते.

आरोग्य हा effort नसावा, तो default lifestyle असावा.

म्हणून कदाचित ज्यांना हा प्रश्न पडतो “कोणता diet follow करावा?”

त्यांच्यासाठी मी फक्त एक तिसरा पर्याय सांगतो आहे.

मी जे सांगतो, पटले तर तसेच फायदे जाणवत असतील तुम्ही सुद्धा शांतपणे सांगू शकता:

मी follow करतो Just For Hearts for Sustainable Health.

Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#metabolic-health#diet#lifestyle#nutrition#exercise#stress#sleep#healthcare
Share:WhatsAppXFacebook