General Health
Mitochondria: पेशींचे Energy निर्माण करणारे कारखाने

आपल्या Inflammation series मध्ये आपण पाहिले की अनेक lifestyle diseases च्या मागे chronic Inflammation असतो.
पण हा Inflammation सुरू होतो कुठून? त्याचे उत्तर मिळते आपल्या शरीरातील पेशींमध्ये.
आणि तिथे भेटतात Mitochondria.
Mitochondria म्हणजे काय?
Mitochondria म्हणजे पेशीतील Energy factories.
जसे शहरात वीज निर्मिती केंद्र बंद पडले तर संपूर्ण शहराचा वेग कमी होतो, तसेच Mitochondria नीट काम करत नसतील तर शरीराची Energy निर्मिती कमी होते.
Energy कशी तयार होते? आपण जे अन्न खातो त्यातून शरीराला मिळतात: * Glucose * Fatty acids
हे घटक Mitochondria मध्ये जाऊन तयार करतात - ATP - शरीराचे Energy चलन.
याच Energy वर चालतात Heart, Brain, Muscles आणि शरीरातील प्रत्येक पेशी.
एक महत्त्वाची गोष्ट ज्या Organs ना जास्त Energy लागते तिथे Mitochondria सुद्धा जास्त असतात. विशेषतः Heart, Brain आणि Muscles.
मग Inflammation शी संबंध काय?
जेव्हा Mitochondria नीट काम करत नाहीत: * Energy निर्मिती कमी होते. * Oxidative stress (पेशींवर पडणारा रासायनिक ताण / पेशींना होणारी Oxygen-संबंधित हानी) वाढतो. * शरीरात Inflammatory signals वाढतात.
म्हणजेच Mitochondria बिघडले की Inflammation प्रक्रिया सुरू होऊ शकते.
OPD मध्ये दिसणारी गोष्ट: काही लोक सांगतात, “Doctor, थकवा खूप येतो पण Reports जवळजवळ normal आहेत.” अशा वेळी अनेकदा समस्या शरीराच्या Energy system मध्ये असू शकते.
आजच्या Lifestyle चा परिणाम: * शारीरिक हालचाल कमी * Processed diet * जास्त Sugar * झोपेचा अभाव * सततचा Stress
हळूहळू यामुळे Mitochondria कमकुवत होतात आणि chronic Inflammation वाढू शकतो.
पुढील Post: पुढील भागात आपण पाहणार आहोत Oxidative Stress, जो Mitochondria आणि Inflammation दोन्हीशी जोडलेला आहे.
Inflammation समजून घ्यायचा असेल तर पेशींची Energy समजून घ्यावी लागते.
अशी शरीराच्या आत काय चालते याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी असे तुम्हाला वाटते का? * हो, नक्की * उपयुक्त माहिती * पुढील Post ची वाट पाहतो
जर असे वाटत असेल तर ही Post आपल्या मित्र-परिवारात जरूर share करा आणि त्यांनाही हा WhatsApp channel join करायला सांगा.
आरोग्याविषयी अशा Science-based चर्चा सहसा होत नाहीत.
Dr. Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology), Just For Hearts