Lifestyle
Ikigai आणि आयुष्यभरासाठी आवश्यक सवयी ज्या डॉक्टर म्हणून मला जाणवल्या
Ikigai वाचलंय? पण डॉक्टर म्हणून मला जाणवलेल्या आयुष्यभरासाठी आवश्यक सवयी आहेत!
जपानमधल्या Okinawa बेटावर 90-100 वर्षांचे लोक सक्रिय, निरोगी आणि आनंदी जगतात. त्यांचं रहस्य साध्या सवयी, सामाजिक नाती आणि जीवनात उद्दिष्ट (Ikigai) आहे.
त्यांच्या जीवनशैलीतून शिकण्यासारखे आयुष्य बदलणारे धडे:
1. उद्दिष्ट (Ikigai): सकाळी उठण्याचं कारण असू द्या, फक्त पैशासाठी नव्हे तर समाधानासाठी.
2. हलका, संतुलित आहार: - 80% पोटभर खाणं (Hara Hachi Bu नियम). - भाज्या, फळं, डाळी, मासे, ओमेगा-3 rich फूड. - साखर व प्रोसेस्ड अन्न कमी करा.
3. नित्य हालचाल: चालणं, घरातील हलकी कामं, स्ट्रेचिंग.
4. हसणे (Laughter Therapy): रोज मनापासून हसणं मानसिक ताण कमी करतं, प्रतिकारशक्ती वाढवते.
5. सोशल gathering: मित्र, कुटुंब, शेजारी यांच्यासोबत वेळ घालवणं – एकटेपणापेक्षा जास्त protective factor.
6. ताण कमी करणं: ध्यान, छंद, लहान आनंद अनुभवणं.
7. निसर्गाशी जोडणं: खुल्या हवेत वेळ घालवणं, झाडं, नैसर्गिक शांतता.
8. सकारात्मक मनोवृत्ती: आशावादी दृष्टी, कृतज्ञता, जीवनाकडे आनंदाने पाहणं.
Ikigai: The Japanese Secret to a Long and Happy Life लेखक: Héctor García & Francesc Miralles
या पैकी एक तरी गोष्ट आजपासून सुरू करा. तुमचा अनुभव मला नक्की सांगा.
हे पोस्ट शेअर करा, कदाचित कोणाचं health आणि आयुष्य बदलू शकेल!
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts