Heart Health
ज्वारी काढण्याच्या season मध्ये Heart Attack आणि Chest Pain च्या प्रकरणांमध्ये वाढ का होते
ज्वारी काढण्याच्या season मध्ये अनेकदा Heart Attack आणि Chest Pain च्या प्रकरणांमध्ये वाढ होते. पण समस्या ज्वारीची नसून अचानक वाढलेल्या ताणाची असते.
ज्वारी काढताना ती मुळासकट उपटावी लागते, ज्यामुळे शरीरावर जोराचा strain येतो. काही वेळा कापून काढली तरी काम फारच कष्टाचे असते.
शेतकरी आणि मजूर वर्षभर काम करत असतात, पण अशा कामात ताण अचानक खूप वाढतो.
अशा वेळी Blood Pressure, heart rate आणि oxygen demand झपाट्याने वाढतात.
ज्यांच्या coronary arteries आधीच borderline अरुंद असतात, त्यांच्यात कधी कधी लपलेली समस्या इथेच उघड होते.
हे शेतीच्या बाबतीत होते, पण शहरातही असं काहीतरी दिसतं:
1. लग्नसमारंभात अचानक तासन्तास dance करणे 2. heavy meals आणि उशिरापर्यंत जागरण 3. weekend trekking
काम, कष्ट आणि आनंद टाळावे असे नाही, पण शरीराची तयारी आणि शरीराचे इशारे ऐकणं महत्त्वाचं आहे.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts