Liver Health
Fatty Liver म्हणजे ‘फॅट खाल्लं’ म्हणून झालेला आजार नाही , … तो शरीराचा पहिला इशारा आहे
Fatty liver ही diagnosis नसून metabolic state आहे. म्हणजे लिव्हरमध्ये fat साठतोय कारण तो fat योग्य प्रकारे process करू शकत नाहीये.
Alcohol नसतानाही fatty liver होतो, कारण insulin resistance (insulin नीट काम न करणं) त्या मुळे शरीरातील fat लिव्हरकडे वळवला जातो.
लिव्हरमध्ये fat साठायला तेल, तूप किंवा साखर जास्तच खावी लागते असं नाही. जास्त calories + कमी muscle वापर हे खरे कारण असते.
म्हणूनच normal वजन असलेले, “मी गोड खात नाही” म्हणणारे लोक fatty liver घेऊन तपासणीला येतात.
सुरुवातीच्या fatty liver मध्ये ALT / AST (लिव्हरचे रक्ततपासणीचे report) पूर्णपणे normal असू शकतात. म्हणजे blood report normal ≠ liver healthy.
Ultrasound मध्ये Grade 1 fatty liver दिसणं हा liver damage नसून functional overload असतो.
या टप्प्यावर fibrosis (कडकपणा) नसतो, सूज (inflammation) नसते, पण metabolism चुकीच्या दिशेने जात असतो.
म्हणून fatty liver हा लिव्हरचा आजार नसून पूर्ण शरीराच्या energy handling चा प्रश्न आहे.
हे वाचताच एक छोटा विचार करा: आज रात्रीचं जेवण आणि झोप यात किती तासांचं अंतर असतं?
याच छोट्या निरीक्षणांवर आम्ही आमच्या YouTube channel वर step-by-step मार्गदर्शन देणार आहोत.
उद्या च्या post मध्ये चर्चा करूयात कोणाला fatty liver 'problem' आहे आणि कोणाला नाही, हे clinically कसं ओळखायचं? तुमचे प्रश्न, शंका, अनुभव comment मध्ये नक्की लिहा.
Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts