Just For Hearts

Lifestyle

Report येण्याआधी Metabolism बिघडतो आणि शरीर त्याचे संकेत देतं

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

Report येण्याआधी Metabolism बिघडतो आणि शरीर त्याचे संकेत देतं.

1. वजन फार न वाढता पोटाभोवती चरबी वाढते → शरीर fat साठवायला लागलंय, वापर कमी झालाय. 2. झोप असूनही सकाळी थकवा, दिवसभर energy कमी → शरीर ऊर्जा नीट तयार करत नाहीये. 3. जेवणानंतर जडपणा, सुस्ती, झोप येणं → sugar वापराऐवजी साठवणूक होतेय. 4. थोडं खाल्लं तरी sugar पटकन वाढते → insulin resistance ची सुरुवात. 5. exercise असूनही fat कमी होत नाही → Metabolism exercise ला respond करत नाहीये. 6. reports ठीक, पण शरीर आतून साथ देत नाही → numbers ठीक, पण process बिघडलेली. 7. वेळेवर भूक लागत नाही, पण उगाच खायची इच्छा होते आणि rhythm बिघडलेला जाणवतो → hormones गोंधळलेले असण्याचा संकेत.

आता Metabolism बिघडल्याचे निदान करणाऱ्या तपासण्या (Tests):

1. Waist circumference वाढलेली → BMI normal असला तरी metabolic risk वाढलेला. 2. Fasting sugar ठीक, पण Post-meal sugar जास्त वाढते → early insulin resistance. 3. HbA1c सीमेवर / हळूहळू वर जातंय → Metabolism आधीच बिघडतोय हे दाखवतं. 4. Triglycerides जास्त आणि HDL कमी → classic metabolic syndrome pattern. 5. TG : HDL ratio वाढलेला → heart-risk Metabolism बिघडल्याचं लवकर सांगतो. 6. USG मध्ये fatty liver (alcohol नसतानाही) → Metabolism fat नीट हाताळत नाहीये. 7. Liver enzymes (SGPT/ALT) किंचित वाढलेले → fatty liver आणि metabolic stress चा संकेत. 8. Blood pressure हळूहळू वर सरकत आहे → एक reading नाही, trend महत्त्वाचा. 9. Fasting insulin / HOMA-IR (select cases) → insulin resistance थेट दाखवणारी तपासणी. 10. Uric acid जास्त → Metabolism आणि insulin resistance शी संबंधित. 11. hs-CRP किंचित वाढलेलं → low-grade metabolic inflammation.

औषध वाढवायच्या आधी, भीती बाळगायच्या आधी:

* Metabolism assess करा ( signs + trends + tests एकत्र ). * signals ओळखा. * योग्य वेळी action घ्या.

Metabolism सुधारणं ही च खरी preventive treatment आहे.

पुढच्या पोस्टमध्ये Metabolism सुधारायला सुरुवात कुठून करायची, तोपर्यंत तुमचे प्रश्न कॉमेंटमध्ये लिहा.

#metabolic-health#lifestyle-medicine#insulin-resistance#fatty-liver#heart-risk#preventive-treatment#metabolism-tests#early-signs
Share:WhatsAppXFacebook