Lifestyle
Diwali बदलली आहे…
Diwali बदलली आहे, आणि ते स्वाभाविक आहे.
आज greetings एका click मध्ये पोहोचतात. Calls होतात. Gifts येतात. Photos, reels, stories सगळं share होतं.
हे सगळं celebration चाच भाग आहे.
पण वर्षानुवर्षं माणसं, नाती, आजार, recovery, loss आणि life चे अनेक phases जवळून पाहताना एक गोष्ट वारंवार जाणवते:
आपण शेवटी वस्तूंपेक्षा moments जास्त आठवतो.
कोणीतरी अचानक भेटायला आलं होतं... एखाद्या संध्याकाळी सगळे एकत्र बसलो होतो... कुठल्यातरी गप्पांवर खूप हसलो होतो... फराळाच्या निमित्ताने भेट झाली होती... आणि नकळत एखादी memory तयार झाली होती.
Digital connection आपल्याला जोडून ठेवतं.
पण प्रत्यक्ष भेटीत नात्यांना एक वेगळी जवळीक मिळते.
Diwali म्हणून कदाचित फक्त greetings exchange करण्यापेक्षा काही लोकांना प्रत्यक्ष भेटणं, काही वेळ एकत्र घालवणं, काही moments phone बाजूला ठेवून जगणं...
यालाही तितकीच जागा असावी.
कारण celebration संपतं. दिवे, पणत्या आणि lights हळूहळू उतरतात. Gifts वापरून संपतात.
पण काही moments...
memories बनून खूप काळ आपल्यासोबत राहतात.
कदाचित म्हणूनच सण फक्त साजरे करायचे नसतात, ते जगायचे असतात.
या Diwali ला connection ही जपूया... आणि presence ही.
आपणा सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts