Blood Pressure
घरच्या घरी BP मोजण्याची सर्वात बरोबर पद्धत
घरच्या घरी BP मोजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य मोजणीसाठी खालील पद्धती वापरा:
1) मोजण्यापूर्वी 5 मिनिटे शांत बसा. बोलणे, चालणे, तणाव यामुळे BP वाढतो. शांत बसा, मग BP मोजा.
2) योग्य बसायची पोजिशन ठेवा: - पाठ टेकलेली - पाय जमिनीवर - हात टेबलवर, हृदयाच्या लेव्हलला ही पोजिशन 10–15 mmHg पर्यंत तफावत कमी करते.
3) कफची योग्य साईज वापरा: - लहान कफ वापरल्यास BP जास्त मोजतो. - मोठा कफ वापरल्यास BP कमी मोजतो. घरच्या मशीनसोबत दिलेला कफ बहुतेकांना योग्य असतो.
4) एकच रीडिंग घेऊ नका, 3 रीडिंग घ्या: 1 मिनिट अंतराने 3 वेळा मोजा. मधली 2 रीडिंग्सचा average सर्वात योग्य BP दर्शवतो.
5) सकाळचा BP सर्वात महत्वाचा आहे: उठल्यावर 30–60 मिनिटांत, औषधांपूर्वी मोजा. सकाळचा BP जास्त असल्यास भविष्यात Heart Attack किंवा Stroke ची जोखीम वाढते.
6) संध्याकाळीही एक सेट मोजा: Routine म्हणून सकाळी (3 readings) आणि संध्याकाळी (3 readings) घ्या. आठवड्यातून 3–4 दिवस पुरेसे असते.
7) कॉफी, चहा, धूम्रपान किंवा व्यायामानंतर लगेच BP मोजणे टाळा, कारण ते BP खोटा वाढवू शकतात.
8) रीडिंग लिहून ठेवा किंवा App वापरा: Morning highs, Stress spikes, Medicine effect यांचा ट्रेंड समजण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. ही माहिती डॉक्टरांसाठी अमूल्य ठरते.
BP tracking का महत्वाचं? - औषधांचे परिणाम दिसतात. - घातक “Silent High BP” वेळेत पकडता येते. - Stroke आणि Heart Attack ची जोखीम कमी होते. - Lifestyle बदल कुठे करायचे ते समजते.
लक्षात ठेवा: सकाळचा BP check हा जीवनरक्षक सवय आहे. घरच्या घरी BP मोजणे सर्वात विश्वसनीय आहे.
BP किंवा sugar tracking मध्ये अडचण असल्यास प्रश्न विचारा.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts