Weight Management
रोज 8–10 हजार Steps चालत असताना Weight कमी का होत नाही?

OPD मध्ये अनेकजण म्हणतात, "Doctor, रोज 45 मिनिटं Walking करतो." "Steps पण 10,000 होतात." "पण तीन महिन्यांपासून Weight तसंच आहे!"
Walking नियमित आहे, हे उत्तम आहे. पण 10,000 Steps म्हणजे Weight loss ची guarantee नाही.
मग चूक कुठे आहे?
1. Walking वाढलं, पण खाणंही वाढलं! Walking नंतर चहा-बिस्किटं, थोडे snacks, मोठे portions किंवा weekend ला जास्त खाणं यामुळे खर्च झालेल्या Calories परत मिळतात. Healthy food सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर Weight कमी होणार नाही.
2. सकाळी 45 मिनिटं Walking, पण बाकी दिवस बसून? सकाळी 5,000 Steps चालले तरी दिवसभर खुर्चीत बसल्याने एकूण Activity कमी होते. Morning Walk चांगला आहे, पण दिवसभर हालचालही महत्त्वाची आहे.
3. Steps जास्त, पण Walking चा Pace किती? 10,000 Steps हळूहळू चालण्याचा आणि काही वेळ Brisk Walking करण्याचा शरीरावर वेगळा परिणाम होतो. थोडा श्वास वाढेल पण बोलता येईल इतका Pace अनेकांसाठी योग्य असतो. पण प्रत्येकाला वेग वाढवणं आवश्यक किंवा सुरक्षित असं नाही.
4. Walking आहे, पण Muscle साठी काय करता? Walking उत्तम आहे, पण Fat कमी करताना Muscle टिकवणंही महत्त्वाचं आहे. आठवड्यातून 2–3 दिवस क्षमतेनुसार Strength Training आणि पुरेसं Protein उपयोगी ठरू शकतं. Weight कमी होण्याबरोबर शरीराची ताकदही टिकली पाहिजे.
5. Sleep कमी आणि Weekend routine वेगळं? कमी झोपेमुळे भूक आणि cravings वाढू शकतात. पाच दिवस Walking आणि diet चांगला, पण weekend ला जास्त खाणं Weight loss ला अडथळा आणू शकतं. Weight loss हा एका दिवसाचा नाही, तर आठवड्याच्या सवयींचा परिणाम असतो.
6. Weight तसंच आहे, पण Waist कमी होत आहे? कधी Fat कमी होत असतानाही Weight काही काळ स्थिर राहू शकतो. म्हणून Waist, Strength आणि कपड्यांचा फिटही लक्षात घ्या. सातत्यपूर्ण प्रयत्न असूनही बदल नसेल तर medicines, Thyroid किंवा इतर कारणांचा review करणे उपयोगी ठरतो.
मग उद्यापासून काय बदलायचं?
- Walking बंद करू नका. - दर तासाला थोडी हालचाल वाढवा. - क्षमतेनुसार Walking चा Pace सुधारा. - Walking नंतर अनावश्यक खाणं टाळा. - Step count बरोबर Brisk Walking चे Steps देखील पाहा.
आता एक छोटा 14-Day Challenge!
Just For Hearts App मध्ये आजच तुमचा Step Count नोंदवा. पुढील 14 दिवस किती Steps होतात, किती नियमित चालता आणि Walking चा Pace कसा आहे हे पाहा.
App डाउनलोड केला आहे का? आजची Steps नोंदवा.
Walking नियमित असूनही Weight कमी होत नसेल, Steps किती ठेवायचे किंवा Pace कसा वाढवायचा याबद्दल प्रश्न असल्यास संपर्क करा.
Walking करून Weight कमी झालं नाही म्हणजे Walking वाया गेलं नाही. पण Steps पूर्ण करणं आणि Weight loss साठी योग्य routine तयार करणं वेगळं आहे.
तुमचा Pattern पाहा आणि Course बदला.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी MD, DNB, FSCAI Senior Consultant Physician & Cardiologist Just For Hearts