Just For Hearts

Heart Health

काही औषधं Coca-Cola सारख्या acidic पेयांसोबत का घ्यावी लागतात?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

आज OPD मध्ये एका cardio-diabetic पेशंटने सहजपणे सांगितले, “सर, skin doctor नी सांगितलंय की गोळी Coca-Cola बरोबर घ्यायला.”

त्याला का असं सांगितलंय हे त्यालाही माहीत नव्हतं. हा अपवाद नाही, मी याआधीही असं ऐकलं आहे. म्हणून हे सगळ्यांसाठी समजून घेणं महत्त्वाचं आहे.

काही औषधांना acidic environment का लागतो?

काही गोळ्या पोटात नीट विरघळून शरीरात शोषल्या जाण्यासाठी थोडं आम्लीय (acidic) वातावरण आवश्यक असतं. Acid कमी असेल तर औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो.

कोणत्या आजारांत वापरली जाणारी औषधं acid सोबत चांगली काम करतात?

- फंगल आजार (त्वचा/नखं): Itraconazole (capsule), Ketoconazole (oral) - अशक्तपणा (Hb कमी): Iron tablets - हाडांचे आजार (Calcium कमी): Calcium carbonate

ही औषधं acidic pH मध्ये चांगली absorb होतात.

Acidic वातावरण कसं तयार करायचं? (Best → Last)

1. जेवणानंतर नैसर्गिक acid 2. लिंबू पाणी (साखर न घालता) 3. संत्र्याचा रस (unsweetened) 4. Coca-Cola (शेवटचा पर्याय)

Coca-Cola acidic आहे, पण जास्त साखर असल्याने diabetes/heart patients साठी योग्य नाही.

उद्देश acidic वातावरण तयार करणं आहे, Coca-Cola नाही.

औषध कधी घ्यायचं याबरोबर कशाबरोबर घ्यायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

औषधं घेताना शंका असेल तर नक्की विचारा:

“हे जेवणानंतर चालेल का?” “Citrus liquid चालेल का?”

हा पोस्ट नक्की share करा, योग्य माहिती चुकीची सवय होण्याआधी पोहोचू देऊया.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#medication-safety#acidic-environment#diabetes-care#heart-health#drug-education#patient-awareness
Share:WhatsAppXFacebook