Lifestyle
आजकाल लोकांना Symptoms normal वाटण्यामागील कारण
आजकाल OPD मध्ये एक नवीन pattern दिसतो. लोक म्हणतात:
- थकवा सगळ्यांनाच असतो. - झोप कमी असते आजकाल. - acidity normal आहे. - दम लागतो, पण वयामुळे असेल.
आणि हळूहळू शरीर struggle करतंय हेच normal वाटायला लागतं.
1. आजकाल लोक आजारांपेक्षा symptoms सोबत जास्त जगतायत: - सतत थकवा - poor sleep - bloating - acidity - low energy - irritability - breathlessness - anxiety
हे symptoms इतके common झालेत की लोक त्यांना problem समजणं बंद करतायत.
2. "मी काम करतोय म्हणजे मी healthy आहे" हा आजचा सर्वात मोठा गैरसमज आहे. लोक ऑफिसला जातात, घर सांभाळतात, social media वर active असतात, पण आतून: - शरीर exhausted असतं - mind overloaded असतं - sleep incomplete असते - metabolism struggle करत असतो
कारण ते "functional" आहेत, त्यांना वाटतं ते ठीक आहेत.
3. शरीर अचानक breakdown होत नाही. ते आधी: - speed कमी करतं - recovery slow करतं - mood बदलतं - patience कमी करतं - energy कमी करतं
पण आपण म्हणतो, "Busy life आहे."
4. सर्वात dangerous phase म्हणजे जेव्हा symptoms इतके जुने होतात की ते normal वाटायला लागतात: - acidity रोजची होते - sleep disturbance routine होतं - tiredness personality बनतं
मग शरीर reports मधून बोलायला लागतं.
5. OPD मध्ये आता एक वेगळं वाक्य खूप ऐकायला मिळतं: "सर, आधी खूप energetic होतो, आता काही करण्याची इच्छा होत नाही." कधी कधी ही फक्त motivation ची problem नसते, शरीर inflamed, stressed आणि metabolically exhausted झालेलं असतं.
6. Pain नसणं म्हणजे health असणं नाही. High BP silently damage करू शकतो. Fatty liver quietly वाढू शकतो. Diabetes nerves आणि kidney affect करू शकतो.
म्हणून "मी ठीक आहे" हे feeling असू शकतं पण medical reality नाही.
आजकाल लोक अचानक आजारी पडत नाहीत, ते वर्षानुवर्षं silently tired होत जातात.