Just For Hearts
← ब्लॉगवर परत

Sleep

7–8 तास झोप झाली तरी सकाळी थकवा का? झोपेचे तास पुरेसे म्हणजे चांगली झोप?

Dr Manisha3 मिनिटांचे वाचन
7–8 तास झोप झाली तरी सकाळी थकवा का? झोपेचे तास पुरेसे म्हणजे चांगली झोप?

अनेकांना 7–8 तास अंथरुणात राहूनही सकाळी थकवा वाटतो. ते विचारतात, “डॉक्टर, मी रात्री 11 ते सकाळी 7 अंथरुणात असतो, तरी उठल्यावर Fresh वाटत नाही. दिवसभर थकवा, आळस आणि कधी डुलकी येते. मग काय चुकतंय?”

हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की झोपेसाठी दिलेला वेळ, प्रत्यक्ष झोप आणि झोपेची Quality ही तीन वेगळी गोष्ट आहेत.

1. आठ तास Bed वर असणं म्हणजे आठ तास झोप नाही!

जर तुम्ही रात्री 11 ते सकाळी 7 अंथरुणात असाल, पण झोप लागायला 30 मिनिटं लागली आणि रात्री एक तास जागे राहिलात, तर प्रत्यक्ष झोप फक्त 6.5 तास झाली. याला Sleep Fragmentation म्हणतात.

बहुतांश प्रौढांना 7–9 तास झोप लागते, पण फक्त तास पुरेसे असणं म्हणजे Restorative Sleep मिळाल्याचा अर्थ नाही.

2. चांगल्या झोपेचे चार महत्त्वाचे भाग:

- Duration: प्रत्यक्ष झोप किती तास झाली? - Continuity: झोप लागायला किती वेळ लागला? रात्री वारंवार जाग आली का? - Regularity: झोपण्याची आणि उठण्याची वेळ रोज सारखी आहे का? - Daytime Functioning: सकाळी Fresh वाटतं का? दिवसभर लक्ष आणि ऊर्जा टिकते का?

म्हणजे झोप किती झाली आणि झोपेनंतर दिवसभर कसं वाटतं, हे दोन्ही महत्त्वाचं आहे.

3. खराब झोप फक्त थकव्यापुरती मर्यादित आहे का?

नाही!

सातत्याने अपुरी, खंडित किंवा अनियमित झोप यांचा संबंध खालील गोष्टींशी आहे:

- Heart & BP: Hypertension आणि Cardiovascular Risk वाढतो. - Sugar & Insulin: Glucose Regulation आणि Insulin Sensitivity प्रभावित होतात. - Weight & Appetite: भूक, खाण्याच्या सवयी आणि वजन नियंत्रणावर परिणाम होतो. - Brain & Mood: Concentration, Memory, Mood आणि Alertness प्रभावित होतात.

झोप ही फक्त विश्रांती नाही, Cardiometabolic Health चा महत्त्वाचा भाग आहे.

ही Risk Associations आहेत; एक-दोन खराब रात्री म्हणजे आजार होणारच, असं नाही.

4. सात-आठ तास झोपूनही थकवा असेल तर काय तपासायचं?

- जोरात घोरणं, श्वास अडखळणं, गुदमरल्यासारखं जाग येणं: Obstructive Sleep Apnoea ची शक्यता. - वारंवार जाग येणं: Insomnia, वेदना, रात्री वारंवार लघवी किंवा इतर Sleep Disturbances. - रोज बदलणारी झोपेची वेळ: Biological Clock विस्कळीत होणं. - इतर कारणं: Anaemia, Thyroid Problems, काही औषधं किंवा मानसिक ताण.

Clinical Point: Fatigue आणि Sleepiness हे एकसारखे नाहीत.

Smartwatch वर चांगला Sleep Score असला तरी Sleep Disorder नसल्याची खात्री होत नाही.

5. पुढील 7 दिवस झोपेचा Pattern पाहा!

फक्त झोपेचे तास नाही, तीन गोष्टी नोंदवा:

- Sleep Duration: झोपण्याची, उठण्याची वेळ आणि अंदाजे प्रत्यक्ष झोप. - Sleep Regularity: रोजच्या वेळेत फरक किती पडतो? - Morning Freshness: उठल्यावर 1–5 Score द्या (1 = खूप थकवा, 5 = एकदम Fresh).

Just For Hearts App मधील Sleep Tracker वापरा. रात्री जाग आल्यास त्याची नोंद ठेवा.

App आधीच आहे? आजची Entry करा. Premium न घेता Tracking सुरू करा.

उठण्याची वेळ नियमित ठेवा आणि पुरेशी झोपेसाठी वेळ राखून ठेवा.

7 दिवसांनी स्वतःला विचारा:

- पुरेसे तास झोपूनही Freshness कमी आहे का? - झोप तुटलेल्या रात्रीनंतर अधिक थकवा होतो का? - झोपेची वेळ नियमित ठेवल्यावर फरक जाणवतो का?

हे Clues मदत करू शकतात, पण कारण निश्चित करत नाहीत.

“घोरणं आहे पण दिवसा डुलकी नाही, तरी Sleep Apnoea असू शकतो का?”, “7-8 तास झोपूनही थकवा का?”, “Sleep Study आवश्यक आहे का?” असे प्रश्न असतील तर डॉक्टरांशी चर्चा करा.

फक्त झोपेचे तास मोजू नका, झोप कशी आहे ते समजून घ्या.

चांगली झोप म्हणजे फक्त पुरेसे तास नाहीत, झोपेचं सातत्य, नियमित वेळ आणि दिवसभराची कार्यक्षमता तितकीच महत्त्वाची आहे.

Pattern पाहा. Course बदला.

महत्त्वाचं: सतत थकवा, डुलकी किंवा झोपेत श्वास अडखळत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. डुलकी येत असल्यास वाहन चालवू नका. स्वतःहून Sleeping Pills सुरू करू नका.

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी MD, DNB FSCAI Cardiology Senior Consultant Physician & Cardiologist Just For Hearts

#sleep-quality#fatigue#sleep-fragmentation#sleep-apnoea#cardiometabolic-health#sleep-tracking
Share:WhatsAppXFacebook