Just For Hearts

General Health

40 च्या आधीच Metabolism का बिघडतोय?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

40 च्या आधीच Metabolism का बिघडतोय?

1. **Early sedentary life** शाळा–कॉलेजपासून screen time वाढला. Muscles नीट वापरले जात नाहीत, Insulin Resistance लवकर तयार होते.

2. **झोपेचा Rhythm 20 च्या दशकातच / Twenties मध्येच बिघडतो** Late nights, मोबाइल, कामाचा ताण. झोप कमी झाली की Hormones, Sugar Control, Appetite सगळं विस्कळीत होतं.

3. **अन्न प्रक्रिया जास्त, अन्न कमी (Ultra-processed foods)** घरचं अन्न कमी, ready-to-eat जास्त. हे पदार्थ Metabolism ला confuse करतात, पोषण न देता overload करतात.

4. **Stress वाढला, पण outlet नाही** पूर्वी ताण physical कामाने उतरायचा. आज Stress Mental आहे, शरीर हलत नाही, Fat साठायला लागतो.

5. **दिवसभर NEAT कमी (Non-exercise activity)** Gym फक्त 30 मिनिटं आहे. बाकीचे 23 तास बसून गेले तर Metabolism मंदावतो.

6. **सतत खाण्याची सवय (Frequent eating)** भूक नसतानाही काहीतरी खाणं. Insulin कायम high राहतो, Metabolic Rhythm बिघडतो.

7. **Weight न वाढता देखील Metabolic बिघाड** सडपातळ दिसणारे लोकही Insulin Resistant असू शकतात. Weight हा एकमेव मापदंड नाही, Metabolism आतून बिघडतो.

8. **Reports उशिरा बदलतात, शरीर आधी संकेत देतं** थकवा, Weight around waist, Sugar Swings हे early Metabolic warnings आहेत, Report नंतर बदलतो.

Metabolism बिघडल्याचे early Signals थोडक्यात:

9. **Weight फार वाढत नाही, पण पोटाभोवती Fat वाढते** हे “age” मुळे नाही. हा Metabolism Fat-storage mode मध्ये गेल्याचा संकेत आहे.

10. **सकाळी उठल्यावरही थकवा, दिवसात Energy कमी** झोप घेतली तरी freshness नाही. याचा अर्थ शरीर Energy नीट तयार करत नाहीये.

11. **उपाशी Sugar ठीक, पण जेवणानंतर पटकन वाढते** हा Insulin Resistance चा सुरुवातीचा टप्पा असतो. Report नंतर बदलतो, शरीर आधी सांगतं.

आज Metabolism “fast” बिघडत नाही. तर तो लवकर बिघडायला लागतो. आणि म्हणूनच आज आजार लवकर दिसतायत.

ही चर्चा चालूच राहणार, stay tuned. कॉमेंटमध्ये प्रश्न विचारा, चर्चा झाली की उपाय सापडतात.

#metabolic-health#early-ageing#lifestyle#insulin-resistance#weight-management#sedentary-life#sleep-disruption#processed-foods
Share:WhatsAppXFacebook