Heart Health
हृदयविकाराचा झटका आला तर उपचाराचा निर्णय कोण घ्यावा?
जेव्हा एखाद्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा उपचार करण्याचा निर्णय रुग्ण किंवा त्याच्या immediate family कडून न घेता शेजारी, दूरचे नातेवाईक किंवा ऑफिसमधले जवळचे मित्र घेतात.
हा आजच्या आरोग्य व्यवस्थेतील सर्वात धोकादायक ट्रेंड आहे.
२५ वर्षांत लाखो रुग्ण पाहताना एक सत्य कधीच बदलत नाही: रुग्ण Critical असतो, पण निर्णय घेणारे लोक Non-Clinical असतात. आणि बर्याच वेळा, जीवाला धोका पोहोचवणारा गोंधळ याच ठिकाणी सुरू होतो.
थोडं स्वतःला विचारू या: तुम्ही कधी अशा प्रसंगी सल्ला दिला आहे का: - जेव्हा तुमचा रुग्णाशी थेट संबंध नसतो? - जेव्हा तुम्हाला रिपोर्ट्स, ECG, angiogram समजत नाहीत? - "थांबा", "कुणाला विचारूया", "अमुक-तमुकांनी सांगितलं" असे म्हणत?
तुम्हाला कधी जाणवलं का की तुमच्या एका वाक्यामुळे angioplasty किंवा treatment उशिरा होऊ शकतो, clot वाढू शकतो, आणि हृदयाला कायमचे नुकसान होऊ शकते?
काही तथ्ये, डॉक्टर म्हणून स्पष्ट सांगतो:
1. आपत्कालीन स्थितीत 'Minutes = Muscle'. उशीर म्हणजे हृदयाचं permanent नुकसान. गैरसमज हा सर्वात मोठा विलंब करतो.
2. निर्णयाचा अधिकार रुग्ण आणि त्याच्या immediate family कडे असतो. बाकी लोक फक्त मत देतात, निर्णय नाही. आणि कधी कधी हे मत जीवघेणं ठरू शकते.
3. दुसऱ्या तज्ञ डॉक्टरचा second opinion घेणे योग्य आहे, पण ८-१० लोकांची 'Free Opinions' आपत्कालात चुकीची ठरतात.
4. डॉक्टर दबाव टाकत नाहीत; ते Risk कमी करत आहेत. माझ्या अनुभवात उपचाराच्या विलंबामुळे हरवलेले जीव, चुकीच्या उपचारांपेक्षा जास्त आहेत.
5. मोठ्या संकटात तज्ज्ञांचा आवाज सर्वात महत्त्वाचा असतो. YouTube, WhatsApp वरील influencers (specialist drs सोडून), अर्धवट माहिती, दूरचा मावस काका यांच्यावर जीवाची बाजी लावू नका.
तुम्ही कधी अशा परिस्थितीत अनावश्यक सल्ला दिला आहे का? किंवा तुमच्या घरात 'दहा लोकांच्या' सल्ल्यामुळे उपचार उशिरा झाले आहेत का? कृपया कमेंटमध्ये सांगा; या विषयावर खुली चर्चा समाजासाठी फार महत्त्वाची आहे.
आदर्शपणे काय करावे: - Immediate family आणि डॉक्टर यांनाच निर्णय देऊ द्या. - बाकी मदत करायची असेल तर फक्त second opinion घेण्यास मदत करा. - जीव वाचवायचा असेल तर गोंधळ कमी आणि clarity जास्त असावी.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts