Just For Hearts

Lifestyle

सर्वात महत्त्वाचे काय आहे?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

What matters most?

हे पुस्तक “self-help” म्हणून नाही, तर life-review म्हणून लिहिले गेले आहे.

Diane Button, लेखिकेने अनेक लोकांशी वेगवेगळ्या वयात, आयुष्याच्या शेवटी संवाद साधला.

यशस्वी करिअर, चांगली आर्थिक स्थिती, जबाबदाऱ्या पूर्ण… सगळे असूनही शेवटी एकच भावना दिसत होती:

“मी खरंच जे महत्त्वाचे होते ते जगलो का?”

आपण रोज जगतो. काम करतो. जबाबदाऱ्या निभावतो. पण थांबून स्वतःला विचारत नाही, खरंच महत्त्वाचे काय आहे?

हे पुस्तक वाचताना जाणवते की आपल्या थकव्याचे कारण “काम” नाही, तर direction नसलेले जगणे आहे.

ह्या पुस्तकातील अंतर्मुख करणारे life lessons:

1. Busy असणे म्हणजे meaningful जगणे नाही.

दिवस भरलेले असतात, पण मन रिकामे वाटते. कारण आपण urgent गोष्टी करतो, important नाही.

2. सगळ्यांना वेळ कमीच असतो.

फरक एवढाच कोणी वेळ कशासाठी वापरतो आणि कोणी कशासाठी टाळतो.

3. Values स्पष्ट नसतील तर निर्णय थकवतात.

काय करावे, काय टाळावे हे ठरवायलाच ऊर्जा जाते. म्हणूनच मन सतत गोंधळलेले असते.

4. “नंतर बघू” केल्यावर Health / निरोगी जीवन कधीच येत नाही.

वेळ मिळाल्यावर झोप, चालणे, काळजी असे म्हणत राहिलो तर शरीर एक दिवस आपोआप थांबते.

5. Relationships / नातेसंबंध neglected राहतात, कारण ते ओरडत नाहीत.

काम deadline देते, नातं शांतपणे सहन करते. पण तुटल्यावर खूप दुखते.

6. आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत राहतो.

पण स्वतःच्या गरजा हळूहळू विसरतो. आणि मग स्वतःच ओझे वाटायला लागतो.

7. Meaning मोठ्या निर्णयांत नाही.

तो रोजच्या छोट्या निवडीत असतो. आज फोन कमी पाहणे, आज थोडे चालणे, आज एखाद्याशी मनापासून बोलणे.

8. Motivation ची वाट पाहू नका.

जी गोष्ट महत्त्वाची आहे ती routine मध्ये टाका. Calendar मध्ये जे आहे तेच प्रत्यक्षात घडते.

9. आयुष्य हा performance report नाही.

शेवटी आठवणीत राहतात marks नाही, moments. Achievements नाही, माणसे.

10. “What matters most” हा प्रश्न रोज विचारा.

मोठे उत्तर नको. आजसाठी एक छोटे उत्तर पुरेसे आहे. आणि त्यावर एक छोटा action.

कदाचित तुम्हाला आयुष्य बदलायची गरज नाही. फक्त priority बदलायची गरज आहे.

आज थांबा. शांतपणे श्वास घ्या. आणि स्वतःला विचारा

“आज, या क्षणी… माझ्यासाठी खरंच काय महत्त्वाचे आहे?”

तेच करा. बाकी सगळे थोडे थांबू शकते.

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#what-matters-most#life-lessons#meaningful-living#self-reflection#priorities#work-life-balance#relationships#health-wellness
Share:WhatsAppXFacebook