Weight Management
Visceral Fat म्हणजे काय आणि ते धोकादायक का आहे?

आपण जी बाहेर दिसणारी चरबी पाहतो ती फक्त वरची (subcutaneous) असते.
पण पोटाच्या आत अवयवांच्या भोवती साचणारी चरबी म्हणजे Visceral Fat (आतील चरबी).
ही दिसत नाही पण जास्त सक्रिय आणि धोकादायक असते.
ही चरबी धोकादायक का? ही फक्त साठवणूक नाही, ही चरबी “chemical factory” सारखी काम करते.
ती शरीरात सतत inflammatory signals सोडते.
Visceral fat वाढली की शरीरात काय बदल होतात?
- oxidative stress (Reactive oxygen / धूर) वाढतो - insulin resistance वाढतो - शरीरात inflammation वाढतो
म्हणजेच आजारासाठी योग्य वातावरण तयार होतं.
स्वतःचे आरोग्य ओळखणं महत्त्वाचं.
खालील लक्षणं असतील तर visceral fat जास्त असण्याची शक्यता:
- पोट पुढे आलेलं (even without much weight gain) - कंबर वाढलेली - बसून काम जास्त - जेवणानंतर जडपणा - Energy कमी वाटणं
reports normal असले तरी risk सुरू असू शकतो.
सोपं उदाहरण: घरात धूर तयार होतो आणि आत कचरा साचलेला आहे तर धूर जास्त टिकतो आणि पसरतो.
तसंच शरीरात visceral fat हा oxidative stress धूर वाढवणारा आणि टिकवणारा घटक आहे.
OPD मधील वास्तव: अनेक रुग्ण जेव्हा सांगतात वजन फार वाढलेलं नाही… पण पोट आहे तिथून च पुढे diabetes, Blood Pressure, heart disease सुरू होतात.
पोट ही फक्त दिसणारी खूण आहे, खरा प्रश्न आत साचलेल्या चरबीचा आहे.
पुढील भागात आपण जे खातो तेच ठरवतं oxidative stress वाढणार की कमी होणार.
Food आणि Inflammation
पोट कमी करणं म्हणजे फक्त दिसणं नाही, तर आत चाललेली disease process थांबवण्याची सुरुवात आहे.
पोटाची आतली चरबी (visceral fat) इतकी महत्त्वाची आहे.
हे तुम्हाला आधी माहित होतं का?
👍 हो ❤️ नवीन आणि महत्त्वाचं 🙂 आता लक्ष देणार
जर उपयुक्त वाटली असेल तर ही पोस्ट मित्र-परिवारात जरूर share करा. अनेकांना हा hidden risk माहितच नसतो.
Dr. Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology), Just For Hearts