General Health
Inflammation म्हणजे काय?

गेल्या काही आठवड्यांत आपण Metabolism बद्दल चर्चा केली – शरीर ऊर्जा कशी तयार करतं आणि वापरतं.
पण अनेक आजार समजण्यासाठी अजून एक महत्त्वाची प्रक्रिया समजणं गरजेचं आहे: Inflammation.
1. Inflammation म्हणजे काय? Inflammation म्हणजे शरीराची defence response. शरीराला infection, injury किंवा metabolic stress जाणवला की शरीर दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करतं.
Blood flow वाढतो, immune cells सक्रिय होतात, repair प्रक्रिया सुरू होते. थोड्या वेळासाठी होणारी ही प्रक्रिया शरीरासाठी आवश्यक असते.
2. समस्या कधी निर्माण होते? समस्या तेव्हा होते जेव्हा ही प्रक्रिया थांबत नाही. म्हणजेच शरीरात chronic low-grade inflammation दीर्घकाळ सुरू राहतो. हळूहळू यामुळे अनेक आजार तयार होऊ लागतात.
3. अनेक आजारांमागचा समान धागा आज OPD मध्ये वारंवार दिसणारे आजार – Diabetes, Heart disease, Fatty liver, Obesity, PCOS, काही cancers – यांच्या मागे अनेकदा chronic inflammation असतो.
4. Metabolism आणि inflammation Metabolism बिघडला → fat storage वाढलं → insulin resistance वाढलं → inflammatory signals वाढू लागले. म्हणजेच Metabolic disease आणि inflammation एकमेकांना वाढवत राहतात.
5. शरीरात inflammation कुठे तयार होतं? fat tissue, liver, blood vessels, gut, mitochondria (पेशींचे energy factories).
6. ही series का? OPD मध्ये अनेकदा लोक सांगतात, “डॉक्टर, मला काहीच त्रास नाही.” पण शरीरात silent inflammation वर्षानुवर्षे चालू असू शकतं. आणि आजार अनेकदा लक्षणं येण्यापूर्वीच तयार होत असतात.
पुढील पोस्टमध्ये आपण Mitochondria आणि ऊर्जा निर्मिती, Oxidative stress, पोटाभोवतीच्या चरबीमुळे होणारा दाह, आतड्यांमधील दाह, आहार आणि दाह यांचा संबंध, झोप आणि दाह यांचा संबंध – सोप्या भाषेत, पण वैज्ञानिक आधारासह पाहणार आहोत.
Inflammation समजलं तर lifestyle diseases समजायला एक नवीन दार उघडतं.
या नवीन “Inflammation Series” बद्दल तुमचं मत काय आहे?
जर हा विषय महत्त्वाचा वाटत असेल तर ही पोस्ट आपल्या family group मध्ये share करा आणि त्यांनाही channel join करायला invite करा.
आरोग्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं हीच खरी prevention.
Dr. Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology), Just For Hearts.