Fitness
VO₂ Max : तुमचा खरा Fitness किती आहे हे सांगणारा नंबर
VO₂ Max : तुमचा खरा Fitness किती आहे हे सांगणारा नंबर
"वय कमी आहे, reports नॉर्मल आहेत… तरी चढ चढताना किंवा थोडं चालताना दम का लागतो?"
अनेकदा याचं उत्तर VO₂ max मध्ये दडलेलं असतं.
1️⃣ VO₂ Max म्हणजे नेमकं काय? VO₂ max = व्यायाम करताना शरीर एका मिनिटात किती ऑक्सिजन वापरू शकतं. जितका जास्त, तितकी तुमची endurance आणि stamina जास्त.
दोन सोपी, relatable उदाहरणं
2️⃣ मोठ्या इंजिनची गाडी चढावरही smooth चालते → high VO₂ max 3️⃣ लहान इंजिनची गाडी थोड्या अंतरातच दमते → low VO₂ max
4️⃣ हे कसं मोजायचं? Lab test हा gold standard आहे, पण आजकाल Apple, Garmin, Fitbit सारख्या smart watches चालताना/धावताना VO₂ max चा अंदाज देतात.
5️⃣ VO2 Normal / Low म्हणजे किती ? साधारणपणे • पुरुष: 35–45 ठीक • स्त्रिया: 27–38 ठीक यापेक्षा कमी असेल तर functional fitness कमी समजली जाते.
6️⃣ आजार नसतानाही दम का लागतो? हृदय किंवा फुफ्फुसांचा आजार नसतानाही बसून राहणारी जीवनशैली → VO₂ max कमी → लवकर श्वास लागतो हे आजकाल खूप common आहे.
7️⃣ VO₂ Max का इतका महत्वाचा आहे? VO₂ max कमी असेल तर → trekking, stairs, exercise कठीण → रोजच्या कामात लवकर थकवा → पुढे जाऊन cardiac–respiratory risk वाढतो
8️⃣ Elderly / Cardio-Diabetic लोकांसाठी विशेष मुद्दा Smart watch मध्ये VO₂ max सोबत resting heart rate, walking pace, recovery time पहा. चालताना फार लवकर दम लागणे, VO₂ max सतत कमी होत जाणे किंवा recovery उशिरा होणे हे ignore करू नका, डॉक्टरांशी चर्चा करा.
9️⃣ सुधारता येतं का? किती वेळ लागतो? Brisk walking, cycling, interval training आठवड्यात 4–5 दिवस केल्यास 6–8 आठवड्यांत फरक जाणवतो, 3–6 महिन्यांत objective improvement दिसते.
एक वास्तव स्वीकारूया
🔟 BMI ठीक आहे म्हणजे fitness उत्तम आहेच असं नाही. खरं महत्वाचं आहे , तुमचं शरीर काम करताना किती सक्षम आहे, आणि ते सांगतो VO₂ max.
Fitness दिसण्यात नाही, functionality मध्ये आहे आणि VO₂ max हे त्याचं खिडकी आहे.
👇 तुमचा VO₂ max (watch मध्ये दिसत असेल तर) comments मध्ये नक्की लिहा , चर्चा करूया.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts