Just For Hearts

Heart Health

Urine ACR Test: एक छोटी तपासणी, मोठा इशारा

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

OPD मध्ये अनेक जण सांगतात, “डॉक्टर, माझा Creatinine Normal आहे.” पण Urine ACR बद्दल विचारलं तर बहुतेक वेळा उत्तर असतं — “ते काय असतं?”

Urine ACR म्हणजे काय?

ACR = Albumin–Creatinine Ratio म्हणजे लघवीतून अतिशय कमी प्रमाणात Protein (Albumin) गळतोय का, हे तपासणं.

ही तपासणी Kidney ला होणारा सुरुवातीचा त्रास खूप आधी दाखवते.

ही तपासणी कुणासाठी महत्त्वाची?

* Diabetes असलेले * BP असलेले * वय 40+ * पाय सूज, फेसाळ लघवी * Creatinine Normal असूनही शंका

Creatinine Normal असताना ACR का करायची?

Creatinine वाढायला बराच उशीर लागतो. ACR मात्र Kidney चा त्रास सुरुवातीलाच पकडतो.

ACR Report कसा वाचायचा?

* < 30 → Normal * 30–300 → Early Kidney Damage * > 300 → Advanced Damage

Symptoms नसतानाही ACR वाढलेलं असू शकतं.

ACR वाढलं तर काय होतं?

* BP, Sugar Kidney वर जास्त परिणाम करतात * Heart Disease चा धोका वाढतो * योग्य वेळी उपाय न केल्यास Damage वाढतो

चांगली गोष्ट काय?

ACR वाढलेलं वेळीच सापडलं तर * Sugar Control * BP Control * योग्य Medicines * Lifestyle बदल यामुळे Damage थांबवता किंवा कमी करता येतं.

ही तपासणी किती वेळा करायची?

* Diabetes / BP → दरवर्षी 1 वेळ * ACR वाढलेलं → डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार

Urine ACR ही Kidney ची ECG आहे. लहान Test, पण मोठं संरक्षण देते.

Creatinine Normal आहे म्हणजे Kidney पूर्ण सुरक्षित आहे असं समजू नका.

टीप: ही माहिती Diabetes आणि BP Patients साठी आहे. इतर आजार असल्यास तपासण्या वेगळ्या लागू शकतात.

तुम्ही कधी Urine ACR केली आहे का? मागच्या Reports शी तुलना केली आहे का?

#urine-acr#kidney-health#diabetes-care#bp-management#preventive-medicine#albumin-creatinine-ratio#early-detection
Share:WhatsAppXFacebook