Just For Hearts

General Health

Urine ACR Test: छोटी Test, मोठा इशारा

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

OPD मध्ये अनेक जण सांगतात “डॉक्टर, Creatinine नॉर्मल आहे.” पण Urine ACR बद्दल विचारलं तर बहुतेक वेळा उत्तर असतं — “ते काय असतं?”

Urine ACR म्हणजे काय? ACR = Albumin–Creatinine Ratio. म्हणजे लघवीतून अतिशय कमी प्रमाणात Protein (Albumin) गळतोय का, हे तपासणं. ही Test Kidney ला होणारा सुरुवातीचा त्रास खूप आधी दाखवते.

ही Test कुणासाठी महत्त्वाची? * Diabetes असलेले * BP असलेले * वय 40+ * पाय सूज, फेसाळ लघवी * Creatinine नॉर्मल असूनही शंका

Creatinine नॉर्मल असताना ACR का करायची? Creatinine वाढायला बराच उशीर लागतो. ACR मात्र Kidney चा त्रास सुरुवातीलाच पकडतो.

ACR Report कसा वाचायचा? * < 30 → Normal * 30–300 → Early Kidney damage * > 300 → Advanced damage लक्षणं नसतानाही ACR वाढलेलं असू शकतं.

ACR वाढलं तर काय होतं? * BP, Sugar Kidney वर जास्त परिणाम करतात. * हृदयविकाराचा धोका वाढतो. * योग्य वेळी उपाय न केल्यास Damage वाढतो.

चांगली गोष्ट काय? ACR वाढलेलं वेळीच सापडलं तर * Sugar control * BP control * योग्य औषधं * Lifestyle बदल यामुळे Damage थांबवता किंवा कमी करता येतं.

ही Test किती वेळा करायची? * Diabetes / BP → दरवर्षी 1 वेळ * ACR वाढलेलं → डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार

Urine ACR ही Kidney ची ECG आहे. लहान Test, पण मोठं संरक्षण देते. Creatinine नॉर्मल आहे म्हणजे Kidney पूर्ण सुरक्षित आहे असं समजू नका.

टीप: ही माहिती Diabetes आणि BP रुग्णांसाठी आहे. इतर आजार असल्यास तपासण्या वेगळ्या लागू शकतात.

#urine-acr#kidney-health#diabetes-care#preventive-medicine#high-blood-pressure#albumin-creatinine-ratio#kidney-damage#early-detection
Share:WhatsAppXFacebook