Just For Hearts

Diabetes

High Sugar Levels समजून घ्या: फक्त Numbers नाहीत

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

YouTube वर एक comment होती: “डॉक्टर, माझी sugar F 256 आणि PP 354 आहे… काय करावं?”

मी त्या patient ला अजून भेटलेलो नाही. Clinical history, examination, आणि Lifestyle माहिती नाही. पण तरीही हे दोन numbers माझ्यासाठी फक्त reports नसतात. मी स्वतः अशा reports कसे वाचतो, कसा विचार करतो आणि शरीर काय सांगतंय ते कसं समजून घेतो हे सांगण्यासाठी ही post.

1. Fasting 256 → रात्रभर काही न खाता देखील Liver uncontrolled sugar तयार करत आहे. Insulin आहे, पण ऐकला जात नाही.

2. PP 354 → जेवणानंतर Glucose पेशींमध्ये जात नाही. Insulin resistance पूर्णपणे active आहे.

3. हे दोन्ही numbers एकत्र आले की → “आज sugar वाढली” असं मी म्हणत नाही → हा Metabolic system बराच काळ बिघडलेला आहे असं समजतो.

4. हा Diabetes अचानक झालेला नसतो → महिने–वर्षांची process → Fatty Liver, पोटाची चरबी, ताण, झोप हे सगळं मागे असतं.

5. Patient उपचारावर नसेल तर → हा Stage ignore करता येणार नाही → योग्य सुरुवात केली तर Damage टाळता येऊ शकतो.

6. उपचारावर असूनही हे numbers असतील तर → औषधाचा प्रकार/वेळ चुकलेली → किंवा Metabolism अजूनही ऐकत नाहीये हा अधिक गंभीर इशारा असतो.

7. मी फक्त sugar बघत नाही → BP, वजन, कंबर, Triglycerides → Lifestyle एकत्र वाचतो.

8. Panic नको, Seriousness हवी → तात्पुरती sugar खाली येते → पण System दुरुस्त केल्याशिवाय टिकत नाही.

9. मी लगेच औषध वाढवत नाही → आधी शरीर का resist करतंय ते शोधतो.

10. हा report Verdict नाही, Warning आहे → वेळेवर समजून घेतला → तर Diabetes ची दिशा बदलू शकते.

ही post report घाबरवण्यासाठी नाही तर report समजून घ्यायला शिकवण्यासाठी आहे.

#report-reading#diabetes-decoded#metabolic-health#sugar-levels#fasting-sugar#pp-sugar#insulin-resistance#diabetes-management
Share:WhatsAppXFacebook