Just For Hearts

Heart Health

Heart Attack निदानातील Type I आणि Type II Error समजून घेणे

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

एक रुग्ण छातीत दुखतं म्हणून हॉस्पिटलमध्ये आला.

डॉक्टरांनी ECG पाहून सांगितलं "Heart attack असू शकतो, admit होऊया."

नंतर तपासणीत कळलं की तो heart attack नव्हता, फक्त acidity होती.

हा Type I error (False Positive) आहे — आजारी नसताना आजाराचा संशय घेणे.

पण विचार करा जर डॉक्टरांनी सांगितलं असतं "काही नाही, घरी जा" आणि खरंच heart attack असता...

तर तो Type II error (False Negative) झाला असता — आजार असूनही ओळख न होणं.

Clinical rule: Heart attack ची शंका असल्यास Type I error चालेल, पण Type II error चालणार नाही.

(स्रोत: इंटरनेट इमेज; statistics पुस्तकं थोडी क्लिष्ट असतात, पण हा फोटो Type I आणि Type II error लगेच समजावतो.)

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी MD DNB FSCAI Cardiology

Just for Hearts ला Follow करा तुमचा metabolism master करण्यासाठी, वजन व्यवस्थापित करण्यासाठी, हृदयाचे संरक्षण करण्यासाठी आणि Diabetes उलटवण्यासाठी.

#heart-attack#ecg#false-positive#false-negative#cardiology
Share:WhatsAppXFacebook