Just For Hearts

General Health

ER मध्ये आलेला एक 15 वर्षांचा मुलगा

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

ER मध्ये आलेला एक 15 वर्षांचा मुलगा…

गेल्या 1 महिन्यापासून त्याला Fever, Cough आणि Weight Loss सुरू होतं. गेल्या 2 दिवसांत त्याला श्वास लागायला लागला.

घरात सगळ्यांना वाटलं, “काहीतरी साधं असेल.” एक Homeopathic सल्ला सुरू होता (कोणत्याही Pathy बद्दल आक्षेप नाही).

पण आजार थांबला नव्हता. तो वाढत होता.

आज तो थेट Emergency Room मध्ये आला.

* Heart Rate: 180 * Oxygen: 60 * तीव्र श्वासोच्छ्वासाचा त्रास

आल्यावर अवघ्या 1 तासात त्याला Ventilator लागला.

X Ray पाहता Pulmonary Koch’s (TB) व आता त्यात झालेली Complications दिसत होती.

आता उपचार सुरू आहेत. पुढचे काही तास फार महत्त्वाचे असतील. तो कसा Respond करतो, ते पाहू.

काय चुकले किंवा काय करायला पाहिजे होते?

* 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त Fever किंवा Cough म्हणजे थांबायचं कारण नाही. * Weight Loss हे लहान मुलांमध्ये एक गंभीर इशारा असू शकतो. * “मुलगा तरुण आहे” हे सुरक्षिततेचं प्रमाणपत्र नाही. * एक उपचार सुरू असूनही सुधारणा नसेल, तर Second Opinion घ्यायलाच हवं. * Pathy बदलणं हा अपमान नाही, तो वेळी घेतलेला निर्णय आहे. * ER मध्ये येण्याआधी निर्णय घेतले असते, तर कदाचित Ventilator टाळता आला असता. * आजार वेळेवर ओळखला गेला नाही, तर तो अचानक जीवघेणा होऊ शकतो.

वेळेवर घेतलेला निर्णय घेणे फार महत्त्वाचे आहे.

#emergency-medicine#pulmonary-tb#timely-treatment#second-opinion#child-health#weight-loss#cough-fever#respiratory-distress
Share:WhatsAppXFacebook