Just For Hearts

Weight Management

Dr. Jason Fung यांच्या The Obesity Code मधून Sustainable Weight Loss साठी 10 महत्त्वाचे धडे

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

वजन वाढणं हा आळशीपणा नाही, तर Hormonal गोंधळ आहे. हेच Dr. Jason Fung यांच्या The Obesity Code पुस्तकाचं सार आहे.

या पुस्तकातून (आणि OPD मधून) मिळालेले थेट धडे:

1. Obesity = Insulin problem. सतत खाणं → Insulin कायम जास्त. Insulin जास्त असेल तर Fat जळतच नाही.

2. Calories नव्हे, Biology ठरवते वजन. दोन लोक सारखं खातात, पण ज्याचं Insulin जास्त → वजन वाढतं.

3. Snacking = silent Weight blocker. प्रत्येक Snack = Insulin spike. 'Healthy Snack' सुद्धा वजन अडवू शकतो.

4. कधी खातो हे, काय खातो याइतकंच महत्त्वाचं. 12–14 तासांचा रात्रीचा Gap Insulin शांत करतो — शरीराला विश्रांती मिळते.

5. Low-Fat Diet का फसते? Fat कमी + Sugar/Carbs जास्त → Insulin अजून वाढतो → वजन, TG, Sugar बिघडतात.

6. 'माझ्यात Discipline नाही' हा गैरसमज. वजन हा Character दोष नाही. तो Hormones चा परिणाम आहे. हे कळलं की Guilt कमी होतो.

7. Clinic Reality (दररोज दिसतं): Snacking बंद + Timing सुधारली → वजन, Sugar, BP टिकाऊ पद्धतीने सुधारतात.

8. Crash Diet = Rebound Weight. खूप कमी खाल्लं → Metabolism मंद → वजन परत वाढतं.

9. Sustainable Weight Loss म्हणजे: * Insulin Control * कमी Meals * ठरलेली Timing * व्यक्तीनुसार सवयी

10. Doctor’s Bottom Line: वजन उपाशी राहून नाही, Insulin शांत केल्यावर कमी होतं. Fancy Diet पेक्षा समज + सवयी जास्त काम करतात.

शिका + आचरणात आणा + शेअर करा = निरोगी रहा

#obesity-code#weight-loss#insulin-resistance#dr-jason-fung#hormonal-imbalance#snacking#meal-timing#sustainable-weight-loss
Share:WhatsAppXFacebook