Just For Hearts

Lifestyle

सिंहाचा प्रश्न: आधुनिक जगण्यावरील एक कथा

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

एकदा जंगलात सिंहाने सगळ्या प्राण्यांना विचारलं… “तुमच्याकडे अन्न आहे, पाणी आहे, सुरक्षितता आहे… तरीही चेहऱ्यावर समाधान का दिसत नाही?”

क्षणभर शांतता पसरली…

एक कोल्हा हळूच म्हणाला… “आम्ही खातो… पण भूक नसताना थांबायचं कधी हे विसरलो.”

एक हरिण म्हणालं… “आम्ही दिवसभर धावतो… पण कुठे पोचायचं हेच कळत नाही.”

एक पक्षी म्हणाला… “आम्ही झोपतो… पण मन कधीच शांत होत नाही.”

सिंह शांत उभा राहिला…

तेवढ्यात एक म्हातारा कासव पुढे आला… आणि हळू आवाजात म्हणाला

“आपण सगळं मिळवलंय… पण जगण्याचा साधेपणा हरवला आहे.”

जंगलात काहीच कमी नाही… तरीही काहीतरी कमी आहे…

कारण समस्या बाहेर नाही ती आपल्या सवयींमध्ये आहे… आपल्या घाईत आहे… आणि स्वतःपासून दूर जाण्यात आहे…

आणि मग सिंह म्हणाला…

“समस्या अन्नात नाही… पाण्यात नाही… तर जगण्याच्या पद्धतीत आहे.”

आज आपली परिस्थितीही वेगळी नाही…

सगळं उपलब्ध आहे… पण शरीराला जे खरंच हवं आहे, ते आपण देतोय का?

शेवटी प्रश्न असा नाही आपण किती मिळवलं…

प्रश्न असा आहे आपण कसं जगतोय…

आणि त्या जगण्यात आपण स्वतःला हरवत तर नाही ना?

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#fable#modern-living#simplicity#mindfulness#lifestyle-habits#satisfaction#inner-peace#self-reflection
Share:WhatsAppXFacebook