Mental Wellness
नातं तुटत नाही, पण तब्येत ढासळते
नातं तुटत नाही, पण तब्येत मात्र ढासळते!
नातं कुठलंच असो—पती-पत्नी, पालक-मुलं, सासर-माहेर—ते टिकलेलं असतं, पण नात्यातला दडपणाचा ताण शरीरात आणि मनात खोलवर आजार निर्माण करतो.
हे प्रश्न अनेकदा विचारले जात नाहीत, म्हणूनच त्यांची उत्तरेही मिळत नाहीत.
तणावग्रस्त नातं तब्येतीवर काय परिणाम करतं?
1. BP आणि हृदयविकार वाढतात सततचा mental stress मुळे BP control होत नाही, ECG बिघडतो.
2. Sugar spikes आणि uncontrolled diabetes Cortisol वाढतो, जेवण आणि रूटीन बिघडतात.
3. डिप्रेशन, Anxiety, आणि भविष्याची भीती आत्मविश्वास कमी होतो, निराशा वाढते, काही वाईट होईल अशी सतत भीती राहते.
4. झोप बिघडते आणि थकवा वाढतो सतत विचार, guilt, आणि बोलाचालीमुळे झोप लागत नाही.
5. Parenting challenges आणि guilt मुलांसमोर वाद, शिवीगाळ, शांततेचा अभाव → guilt आणि frustration वाढतो.
6. Libido आणि relation intimacy कमी होतात मनात राग आणि द्वेष असल्यामुळे physical intimacy बंद होते.
7. Long-term body pain (Psychosomatic issues) पाठदुखी, पोटात गोळे, केस गळणे, acidity हे सततच्या तणावाचे परिणाम आहेत.
8. मुलांवर मानसिक परिणाम रडवेलपणा, withdrawn होणं, अभ्यासात रस न येणं.
9. Court cases आणि Police complaints मुळे PTSD उगाच कोर्ट आणि police मुळे severe stress, humiliation, आणि social isolation होतो.
10. वयोवृद्ध पालक anxiety, BP, आणि depression ने त्रस्त होतात मुलांच्या त्रासामुळे त्यांची झोप, खाणं, आणि औषधं बिघडतात.
✅ उपाय काय? • Couples / Family Therapy (Online आणि Offline दोन्ही पर्याय) • डॉक्टरकडे जाता तसं therapist कडे लवकरात लवकर जावं • योगा, मेडिटेशन, व्यायाम, आणि self-awareness • आवश्यक निर्णय घ्या, तब्येतीचं नुकसान होईपर्यंत थांबू नका
अनेक वर्षांच्या अनुभवातून सांगू शकतो की lifestyle आजारांची सुरूवात शरीरात नाही, तर नात्यात होते!
तुमचं मत काय? Strained marriage किंवा relationships ने तुमच्या किंवा तुमच्या घरच्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये share करा. कदाचित तो कुणाचं आयुष्य वाचवेल!
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts