Just For Hearts
← ब्लॉगवर परत

General Health

कोरेगाव, सातारा येथील सर्पमित्र Yogesh Dhumal यांच्या मृत्यूची दुःखद बातमी

Dr Ravindra L Kulkarni4 मिनिटांचे वाचन

कोरेगाव, सातारा येथील सर्पमित्र Yogesh Dhumal यांच्या मृत्यूची बातमी मनाला लागली आहे.

कोरेगाव माझं गाव आहे. शेतात, उसाच्या फडात जाताना साप दिसणं आमच्यासाठी अनोळखी नाही.

बातमीनुसार, Russell’s Viper पकडताना भावाच्या हाताला दंश झाला. दंश झाल्यानंतरही भाऊ काही काळ snake rescue मध्ये व्यस्त होता.

मी हे “सर्पमित्र overconfident असतात” म्हणून लिहित नाही.

ते प्रशिक्षित असतात, अनेक जीव वाचवतात आणि स्वतःही धोका पत्करतात.

पण snakebite मध्ये एक कठोर नियम आहे: Bite झाल्यानंतर rescue संपतो. त्या क्षणापासून rescuer देखील patient होतो.

1. लगेच काय करायचं?

- व्यक्तीला शांत ठेवा. - bitten limb शक्य तितका स्थिर ठेवा. - अंगठी, bracelet किंवा घट्ट वस्तू काढा. - तात्काळ ASV उपलब्ध असलेल्या hospital कडे निघा.

स्वतः bike किंवा car चालवू नका. Walking, running किंवा काम पूर्ण करण्यात वेळ घालवू नका.

टाळा: - घट्ट tourniquet - wound कापणं - venom चोखणं - ice किंवा electric shock - herbal औषधं / “विष उतरवणं” - मांत्रिक किंवा वैद्याकडे आधी जाणं - साप पकडून hospital ला घेऊन जाण्यात वेळ घालवणं

अशा अनेक गोष्टी आजही गावाकडे केल्या जातात आणि सर्वात मोठं नुकसान वेळेचं होतं. WHO देखील traditional treatment आणि delayed hospital arrival हे महत्त्वाचे अडथळे मानते.

2. भारतातील मुख्य venomous snakes

आपले Big Four: - नाग - Indian Cobra - मण्यार - Common Krait - घोणस - Russell’s Viper - फुरसे - Saw-scaled Viper

India मधील polyvalent ASV मुख्यतः या चार species विरुद्ध तयार केलेलं असतं.

3. Neurotoxic bite मध्ये वेळ फार महत्त्वाचा आहे.

नाग आणि मण्यार मुख्यतः nerves आणि breathing muscles वर परिणाम करतात.

लक्षणं: - पापण्या पडणे - double vision - बोलताना किंवा गिळताना त्रास - आवाज बदलणे - मान धरता न येणे - श्वास कमी होणे

इथे ASV + airway support + वेळेवर ventilator lifesaving ठरू शकतो.

काही neurotoxic patients काही तास किंवा दिवस ventilator वर राहून पूर्ण recover होतात.

काही cases, विशेषतः cobra syndrome मध्ये Atropine + Neostigmine उपयोगी पडू शकतात. हे trained medical team ठरवते.

4. Vasculotoxic / Haemotoxic bite

घोणस आणि फुरसे blood clotting, blood vessels आणि kidneys वर परिणाम करतात.

लक्षणं: - pain आणि swelling - gums, nose किंवा wound मधून bleeding - urine मध्ये blood - Blood Pressure कमी होणे - clotting abnormal - kidney injury

एक महत्त्वाची चूक म्हणजे “अजून bleeding नाही, म्हणजे वेळ आहे.” तसं नाही.

घोणसचा bite “थोडं बघू” असा bite नाही.

5. Specific treatment - ASV

ASV हे venom neutralise करणारे specific treatment आहे.

Current Indian guidance मध्ये clinically significant bite / सर्पदंश / envenoming असल्यास सामान्यतः:

Initial ASV = 10 vials IV infusion

पुढचे vials symptoms, neurotoxicity किंवा clotting response नुसार ठरतात.

Neurotoxic cases मध्ये repeat dose देऊन maximum साधारण 20 vials लागू शकतात.

महत्त्वाचं:

ASV dose patient च्या वजनावर ठरत नाही कारण venom neutralise करायचा असतो, patient चं वजन नाही.

म्हणून child मध्येही indicated ASV dose कमी करून देत नाहीत.

ASV reaction होऊ शकते; म्हणून ते trained team + adrenaline/resuscitation support असलेल्या facility मध्ये द्यायचं.

6. मग deaths का होतात?

Treatment theoretically सोपं वाटतं: Recognise → Transport → ASV → Organ support

पण ground reality मध्ये: - bite गंभीर आहे हे उशिरा मान्य करणं - “थोडं बघू” म्हणणं - मांत्रिक/घरगुती उपाय - transport delay - ASV stock नसणं - trained team नसणं - ventilator/dialysis दूर असणं - referral उशिरा होणं

हे outcome बदलतात.

WHO नुसार snakebite चा सर्वाधिक भार rural, agricultural आणि working-age populations वरच आहे.

7. म्हणून या घटनेचा अर्थ फक्त एक व्यक्तीपुरता नाही.

ही घटना मला जवळची वाटते कारण कोरेगाव माझं गाव आहे.

दरवर्षी अनेक शेतकरी, मजूर, महिला, मुलं आणि snake rescuers याच एका चुकीच्या विचारामुळे वेळ गमावतात:

“आत्ता ठीक आहे… थोडं बघू.”

Snakebite मध्ये बाहेरून माणूस ठीक दिसत असताना venom आतून काम करत असू शकतो.

लक्षात ठेवा:

Snake पकडणं skill आहे. Snakebite नंतर वेळ न दवडणं wisdom आहे.

Bite झाल्यावर काम, rescue, श्रद्धा, crowd सगळं थांबायला हवं.

Priority फक्त एक: योग्य hospital. आत्ताच.

ज्या जीवाला वेळेत treatment मिळालं असतं आणि तो वाचू शकला असता तो जीव गमावणं सर्वात वेदनादायक आहे.

Dr Ravindra L Kulkarni Sr Consultant Physician & Cardiologist Just For Hearts

#snakebite#snake-rescue#rural-health#asv#venomous-snakes#emergency-care
Share:WhatsAppXFacebook