Just For Hearts

Liver Health

थोडंसंच वाढलेला Creatinine: Kidney साठी काय महत्त्व आहे

Just For Hearts3 मिनिटांचे वाचन

"Creatinine थोडंसंच वाढलंय…" हे वाक्य dialysis च्या आधी अनेकदा ऐकायला मिळतं.

OPD आणि ICU मध्ये kidney चे रुग्ण पाहताना वर्षानुवर्षं एकच pattern दिसतो:

1. kidney अचानक खराब होत नाही. 2. ती हळूहळू थकत जाते.

आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे सुरुवातीला शरीर मोठ्याने warning देत नाही.

म्हणून अनेक रुग्णांना disease कळतं तेव्हा बराच वेळ निघून गेलेला असतो.

1. Creatinine हा फक्त report मधला number नाही.

Creatinine वाढणं म्हणजे अनेक वेळा: - kidney ची filtering क्षमता कमी होत चालली आहे. - शरीरातील waste व्यवस्थित बाहेर पडत नाहीये.

पण OPD मध्ये खूप वेळा एकच वाक्य ऐकायला मिळतं "थोडंसंच वाढलंय…" किंवा "नंतर repeat करू…"

आणि त्या वेळेत kidney quietly damage होत राहते.

2. Chronic Kidney Disease (CKD) अनेकदा silent असतो.

सुरुवातीच्या stages मध्ये: - थकवा वाढणं - पाय सूजणं - BP वाढणं - भूक कमी होणं - रात्री वारंवार लघवी

ही symptoms खूप “सामान्य” वाटतात, त्यामुळे disease अनेकदा उशिरा diagnose होतो.

3. सर्वात common चूक म्हणजे “त्रास नाही म्हणजे problem नाही”.

Kidney disease मध्ये pain असेलच असं नाही.

काही वेळा: - creatinine वाढत असतो - urine मध्ये protein येत असतं - BP uncontrolled असतो

पण रुग्ण म्हणतो मला काही जाणवत नाही आणि हाच silent phase सर्वात महत्त्वाचा असतो.

4. Diabetes आणि BP हे kidney damage चे सर्वात common कारण आहेत.

वर्षानुवर्षं uncontrolled: - diabetes - high BP - painkiller चा जास्त वापर - smoking - dehydration

हे kidney ला हळूहळू कमजोर करत राहतात.

आणि अनेक वेळा damage दिसेपर्यंत filtering capacity खूप कमी झालेली असते.

5. योग्य वेळी केलेल्या तपासण्या outcome बदलू शकतात.

Creatinine, eGFR, Urine protein / microalbumin, BP monitoring, Kidney sonography या तपासण्या फक्त reports नसतात. - त्या kidney किती stress मध्ये आहे - damage किती वाढलं आहे - progression किती fast आहे

हे वेळेत समजण्याची संधी असते.

6. आज CKD management खूप बदललं आहे.

- diabetes control - BP control - kidney-protective medicines - proteinuria control - lifestyle modification

यामुळे अनेक रुग्णांमध्ये kidney decline खूप slow करता येतो.

काही रुग्णांमध्ये dialysis अनेक वर्षं पुढे ढकलता येऊ शकतो पण diagnosis आणि treatment वेळेत सुरू झालं तरच.

7. पूर्ण ignore केलं तर काय होऊ शकतं?

काही रुग्ण वर्षानुवर्षं follow-up टाळतात आणि मग एक दिवस:

- creatinine खूप वाढलेलं असतं - शरीरात पाणी साचलेलं असतं - श्वास वाढलेला असतो - potassium धोकादायकरीत्या वाढलेलं असतं

आणि मग discussion सुरू होतो dialysis कधी सुरू करायचं?

8. ICU मध्ये दोन वेगळ्या stories दिसतात.

काही रुग्ण सुरुवातीलाच लक्ष देतात: - sugar आणि BP control करतात - नियमित follow-up ठेवतात

अशा रुग्णांमध्ये kidney अनेक वर्षं stable राहू शकते.

काहीजण “थोडंसंच वाढलंय” म्हणत राहतात आणि मग अचानक admission, dialysis आणि repeated hospital visits सुरू होतात.

फरक अनेकदा disease मध्ये नसतो, फरक timing मध्ये असतो.

लक्षात ठेवा Kidney अचानक fail होत नाही, ती आधी reports मधून मदत मागत असते.

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#creatinine#kidney-health#ckd#diabetes#blood-pressure#dialysis#kidney-disease#health-awareness
Share:WhatsAppXFacebook