Just For Hearts

Lifestyle

Resolutions नको, Routine च महत्त्वाची: 2026 मध्ये निरोगी राहण्यासाठी

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌱 2026 हे वर्ष “काळजी घेण्याचं” ठरू दे.

आज एक गोष्ट स्पष्ट करूया: Resolutions ❌ | Routine ✅ कारण आरोग्य एका दिवसाच्या निर्धाराने नाही, रोजच्या सवयींनी बदलतं.

Resolutions नको, Routine च महत्त्वाची

1. संकल्प तुटतात, सवयी टिकतात. उत्साह 7–10 दिवस टिकतो; Routine मात्र आयुष्यभर साथ देते. 2. Sugar–BP रोज वागतात. महिन्यातून एकदा नाही, दररोजची छोटी शिस्त परिणाम देते. 3. औषधं आधार देतात, सवयी दिशा देतात. दोन्ही एकत्र असतील तरच परिणाम टिकतो. 4. मोठे बदल नको, छोटे बदल पुरेसे. 1–2 मिनिटांची सवयही metabolic control सुधारते. 5. वेळ नाही म्हणणं सोपं; वेळ काढणं शहाणपण. Routine वेळ घेत नाही, त्रास वाचवते. 6. Weight कमी करायचं नाही, तर दिनक्रम सुधारायचा. Weight आपोआप बदलायला लागतं. 7. Cardio-Diabetic रुग्णांसाठी सातत्य हेच जीवनरक्षक. चढ-उतार कमी झाले की धोका कमी होतो. 8. Caregivers साठीही Routine आवश्यक. तुमची तब्येत ठीक असेल तरच काळजी नीट घेता येते. 9. Healthy आहात? Routine तुम्हाला तसंच ठेवते. आजार येऊ नयेत, हीच खरी prevention. 10. Routine म्हणजे कंटाळा नाही, सुरक्षितता. शांत, स्थिर आणि विश्वासार्ह आरोग्य.

🌿 2026 साठी एकच आग्रह: दररोज थोडं करा, पण नियमित करा.

हे सगळं जे तुम्ही वाचताय, अमलात आणताय हा Just For Hearts Program आहे: वैज्ञानिक, सोपा आणि sustainable health साठी डिझाइन केलेला.

जे खरोखर आवश्यक आहे तेच track करायला शिकणे – गोंधळ नको, जास्त मोजमाप नको, फक्त अर्थपूर्ण निरीक्षण.

Routine सुरू ठेवा, आरोग्य आपोआप येईल. ❤️

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#routine#resolutions#healthy-habits#lifestyle#preventive-health#cardio-diabetes-care#metabolic-health#weight-management
Share:WhatsAppXFacebook