Nutrition
Protein Supplement: Science की Marketing?
"Protein powder घ्यावं का?" हा प्रश्न आजकाल खूप विचारला जातो. मी एकच विचारतो: तुमच्या plate मध्ये Protein पुरेसं आहे का?
1. Supplement म्हणजे base नाही. Protein powder हा जेवणाचा पर्याय नाही. तो shortfall / कमतरता भरतो, Diet सुधारत नाही.
2. कोणाला उपयोग होऊ शकतो? * 40+ आणि Protein intake कमी असलेल्यांना. * Sarcopenia चा Risk असलेल्यांना. * Weight कमी करताना Muscle जपायचा असेल तर. * Vegetarian Diet मध्ये Protein gap भरण्यासाठी. * आजारानंतर आलेल्या कमजोरीसाठी. Gym करणं compulsory नाही. Metabolic patients मध्ये सुद्धा याचा उपयोग होतो.
3. किती घ्यायचं? बहुतेक लोकांना 15-25 g/day (≈ 1 scoop) पुरेसं असतं. Double scoop = better result असं Science सांगत नाही.
4. Meal-wise signal महत्त्वाचा. Muscle ला “repair signal” मिळण्यासाठी प्रत्येक Meal मध्ये 20-30 gm total Protein उपयुक्त ठरतो. Powder नव्हे तर total intake महत्त्वाचा.
5. Whey की Plant? Whey: * पटकन absorb होते. * Leucine जास्त असते. Plant Protein: * Lactose intolerance मध्ये योग्य. * Vegan लोकांसाठी practical. Label वाचा. Sugar added नसावा.
6. Kidney बाबत भीती. Normal Kidney function असेल तर moderate Protein सुरक्षित असतो. CKD मध्ये मात्र individualized planning आवश्यक आहे.
7. Common चुका. * Powder घेतो पण Strength training नाही. * Total Calories वाढतात. * Mass gainer वापरतो. * Diet calculate करत नाही.
8. Metabolic clarity. Protein powder Fat burner नाही. तो Muscle protector आहे. Muscle टिकला की Sugar handling सुधारतो.
माझे मत - Supplement हा tool आहे. Solution नाही. पहिलं सुधारायची plate, नंतरच scoop.
पुढचा भाग: Strength training - Muscle signal कसा द्यायचा?
तुम्ही Protein Supplement वापरता का? हो कधी कधी नाही विचार करतोय