Nutrition
Metabolism आणि Protein: Hype च्या पलीकडे
Hype नाही. Physiology आहे.
Weight कमी करायचं आहे… की Metabolism मजबूत करायचं आहे?
Protein हा gym चा विषय नाही. तो Muscle टिकवण्यासाठी आणि Glucose control साठी मूलभूत घटक आहे.
OPD मध्ये दोन टोकं दिसतात: Protein कमी, किंवा अनावश्यक जास्त.
चला स्पष्ट करू.
1. Muscle = Glucose Buffer
जेवणानंतरचा Glucose मोठ्या प्रमाणात Muscles मध्ये जातो. Muscle mass चांगला असेल तर Post-meal sugar spikes कमी होतात. Muscle कमी → Glucose जास्त वेळ रक्तात. Metabolism इथेच सुरू होतो.
2. Protein म्हणजे Muscle Maintenance Signal
Muscle टिकवण्यासाठी रोज Protein signal आवश्यक असतो. Muscle कमी झाला की Resting metabolic rate कमी होतो. यामुळे Fat regain सोपं होतं, जरी Calories सारख्याच असल्या तरी.
3. Weight Loss ≠ Metabolic Win
Scale खाली आला म्हणजे सगळं ठीक असं नाही. जर Muscle सुद्धा कमी झाला तर Long-term metabolism कमकुवत होतो. मी OPD मध्ये वारंवार पाहतो, “वजन कमी, पण ताकदही कमी.” ही Metabolic सुधारणा नाही.
4. Protein & Appetite Physiology
Protein Satiety hormones stimulate करतो. Stable Protein intake → stable Appetite pattern. फक्त Calorie कमी केल्याने Cravings कमी होत नाहीत, तर Protein balance महत्त्वाचा.
5. 40+ वयानंतर Muscle Risk वाढतो
Age-related Muscle loss हळूहळू सुरू होतो (Sarcopenia). या टप्प्यावर “योग्य प्रमाण + योग्य distribution” महत्त्वाचं असतं. Excess नाही. Neglect नाही.
6. Leucine का चर्चेत येतो?
Leucine हा Essential amino acid आहे जो Muscle protein synthesis सुरू करण्यासाठी Trigger म्हणून काम करतो. म्हणून Protein quality महत्वाची आहे. फक्त Grams मोजणं पुरेसं नाही.
7. Prediabetes / Insulin Resistance मध्ये भूमिका
Muscle हा Insulin sensitivity चा मुख्य घटक आहे. Muscle टिकला तर Glucose disposal सुधारू शकतो. मी याला “Metabolic braking system” म्हणतो.
8. Over-Hype टाळा
Bodybuilder level Protein सगळ्यांना लागत नाही. Excess intake म्हणजे extra फायदा नाही. Context-based, consistent intake पुरेसं असतं.
9. Food First. Supplement Later.
सुरुवात नेहमी Plate पासून करा. स्वतःला विचारायचा पहिला प्रश्न: “मी रोजच्या जेवणातून किती Protein घेतो?” जर Plate मधून intake पुरेसा असेल तर Supplement आवश्यकच असेल असं नाही.
माझे मत:
Protein Fat loss trick नाही. तो Muscle insurance आहे. Muscle म्हणजे Metabolic insurance.
पुढील Posts मध्ये: • Veg diet + Protein • Non-veg diet + Proteins • Supplements, कधी आणि किती
तुमच्या Plate मध्ये Protein स्पष्ट दिसतो का? 💪 हो 🥗 सुधारायला हवा 🤔 खात्री नाही
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts