General Health
Oxidative Damage: पेशींना होणारं खरं नुकसान
ऊर्जा तयार करताना तयार होणारा “धूर” (Oxidative Stress) पेशींना नुकसान करतो हे आपण पाहिलं. आता महत्त्वाचं समजून घेऊ हा Oxidative Stress नेमका कसा नुकसान करतो?
1. पेशींच्या भिंतीवर परिणाम प्रत्येक पेशीभोवती संरक्षक आवरण (cell membrane) असतं. हा “धूर” (Oxidative Stress) या आवरणातील चरबी (lipids) वर हल्ला करतो यालाच म्हणतात lipid peroxidation. 👉 यामुळे • पेशीचं संरक्षण कमी होतं • आत-बाहेरची देवाणघेवाण बिघडते
2. Protein वर परिणाम शरीरातील काम करणारे घटक म्हणजे Protein. Oxidative Stress या Protein च्या रचनेत बदल करतो याला म्हणतात protein oxidation. 👉 यामुळे • Protein चं काम कमी होतं • कधी चुकीचं काम होऊ शकतं
3. DNA वर परिणाम प्रत्येक पेशीमध्ये DNA (सूचना देणारी प्रणाली) असते. Oxidative Stress त्यात छोटे damage करतो. 👉 दीर्घकाळात • पेशींचं वागणं बदलू शकतं • आजारांची सुरुवात होऊ शकते
4. “आतील गंज” म्हणजे काय? आपण म्हणतो तो “आतील गंज” म्हणजेच Oxidative Damage / Oxidation. जसं लोखंड गंजतं तसंच शरीरात Oxidative Stress वाढला की पेशींमध्ये हळूहळू “आतील गंज” तयार होतो.
5. मग पुढे काय होतं? जेव्हा हे नुकसान वाढतं → पेशी नीट काम करत नाहीत → शरीर त्याला धोका समजतं 👉 आणि सुरू होते inflammation (दाह प्रक्रिया).
6. कोणते अवयव जास्त प्रभावित? जिथे काम जास्त तिथे Oxidative Stress जास्त. • Heart • Brain • Blood Vessels • Liver 👉 म्हणून हे अवयव लवकर प्रभावित होतात.
7. OPD मधील वास्तव अनेकदा reports normal असतात पण आतून damage सुरू असतो. 👉 हा “Oxidative Damage” हळूहळू वर्षानुवर्षे वाढतो.
काय लक्षात ठेवायचं? “धूर” (Oxidative Stress) दिसत नाही, पण त्याचा परिणाम “आतील गंज” (Oxidative Damage) म्हणून दिसतो.
पुढील भागात कशाप्रकारे पोटातील आतील चरबी (Visceral Fat) जी Oxidative Stress आणि inflammation वाढवते ते बघूयात. आजार अचानक दिसतात, पण त्यांची सुरुवात Oxidative Stress पासून पेशींच्या पातळीवर खूप आधी झालेली असते.