Lifestyle
Osteoporosis: Calcium पेक्षा अधिक महत्त्वाचा आजार
Osteoporosis हा फक्त Calcium ची कमतरता नाही.
OPD मध्ये अनेकदा एकच प्रश्न विचारला जातो, “Sir, Calcium घ्यायला सुरुवात करू का?”
पण Osteoporosis management फक्त Calcium ने होत नाही. Diagnosis, risk assessment, lifestyle आणि योग्य औषधं सगळं एकत्र पाहावं लागतं.
चला, point wise समजून घेऊ.
1️⃣ Osteoporosis शांतपणे वाढतो. सुरुवातीला वेदना नसतात. पहिलं लक्षण अनेकदा vertebral fracture, wrist fracture किंवा hip fracture असू शकतं.
2️⃣ कोणाला risk जास्त? - Menopause नंतरच्या महिला - वय >60 वर्ष - कमी वजन किंवा frailty - दीर्घकाळ steroid औषधं - diabetes, thyroid, CKD - smoking आणि alcohol - family history
3️⃣ Diagnosis अंदाजाने नाही, test ने करावं. Standard test: DEXA Scan (Bone Mineral Density) T-score: - -1 ते -2.5 → Osteopenia - ≤ -2.5 → Osteoporosis
4️⃣ Calcium supplements सर्वांसाठी नाहीत. सगळ्यांनी Calcium tablets सुरू करणं योग्य नाही. पहिल्यांदा पाहावं: - diet मध्ये Calcium किती आहे - Vitamin D status - fracture risk अन्यथा unnecessary supplements चालू होतात.
5️⃣ रोजची physiological गरज: - Calcium ~1000–1200 mg/day - Vitamin D ~800–1000 IU/day ही गरज diet + sunlight + supplements एकत्र पूर्ण होते.
6️⃣ Diet महत्वाचा आहे (फक्त tablets नाही). Calcium rich foods: दूध, दही, पनीर, ragi, नाचणी, sesame (तीळ) आणि leafy vegetables. Protein intake सुद्धा हाडांसाठी महत्त्वाचा.
7️⃣ Sunlight प्रभावी पण दुर्लक्षित उपचार आहे. Vitamin D साठी 20–30 मिनिटे सकाळची सूर्यप्रकाशात चालणं (face + arms exposed) आवश्यक आहे; फक्त tablets पुरेसे नसतात.
8️⃣ Exercise - हाडं चालवली तर टिकतात. हाडांना load लागला की bone strength टिकते. Best exercises: - brisk walking - stair climbing - resistance training - balance exercises
9️⃣ Osteoporosis confirmed असेल तर फक्त Calcium पुरेसं नसतं. Guideline-based medicines: - Bisphosphonates - Yearly / 6-monthly injections - काही cases मध्ये anabolic therapy हा decision DEXA + fracture risk वर घेतला जातो.
🔟 मोठी चूक काय होते? - Calcium tablets वर्षानुवर्षे चालू - DEXA scan कधीच नाही - exercise नाही - sunlight नाही म्हणजे treatment असते पण disease control होत नाही.
Osteoporosis हा Calcium deficiency चा आजार नाही, तो bone strength कमी होण्याचा आजार आहे.
म्हणून management मध्ये screening + nutrition + exercise + योग्य औषधं सगळं महत्त्वाचं आहे.
तुम्ही कधी Bone Density Test (DEXA scan) केला आहे का? - 👍 हो केला आहे - 🤔 डॉक्टरांनी सांगितलं पण अजून केला नाही - ❌ कधी केला नाही
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts