Just For Hearts

Lifestyle

तुम्ही आळशी नाही…

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

तुम्ही आळशी नाही… तुमचं शरीर सतत ‘Fight Mode’ मध्ये अडकलेलं आहे.

माझा अनुभव सांगतो लोक आळशी नसतात. त्यांचं nervous system थकलं असतं.

OPD मध्ये रोज ऐकतो: •“सर, काहीच करावंसं वाटत नाही.” •“रात्री गोड खायची इच्छा होते.” •“BP कधी वाढतो कळत नाही.” •“झोप लागत नाही.”

ही motivation ची समस्या नाही. ही regulation ची समस्या आहे.

1. Fight Mode म्हणजे नेमकं काय? शरीरात दोन प्रमुख स्थिती असतात:

• Sympathetic (Fight Mode) • Parasympathetic (Repair Mode)

Fight Mode मध्ये: • Heart rate वाढतो • BP वाढतो • Cortisol वाढतो • Liver glucose सोडतो

हा प्रतिसाद “धोक्यासाठी” आहे. दिवसभरासाठी नाही.

2. आजचा माणूस सतत Fight Mode मध्ये का? कारण: • सकाळपासून screen • सतत सूचना (notifications) • Mental stress • झोप ६ तासांपेक्षा कमी • अनियमित जेवण

मेंदूला “सुरक्षित” असल्याचा सिग्नल मिळत नाही.

3. दीर्घकाळ Fight Mode चालू राहिला तर? • Insulin resistance वाढू शकतो • पोटाभोवती चरबी वाढते • BP नियंत्रण बिघडतं • झोपेची गुणवत्ता कमी होते

4. हा आळस नाही. हे Dysregulation आहे.

जर तुम्हाला: • सतत fatigue • रात्री जास्त खाणं • लहान गोष्टींवर चिडचिड • सकाळी fresh न वाटणं

असं होत असेल, तुम्ही कमजोर नाही. तुमचं nervous system overload आहे.

5. सुरुवात मोठी नसावी. Physiological असावी.

आजपासून फक्त:

✔ जेवणानंतर 10 मिनिट शांत चालणं ✔ झोपण्याआधी 30 मिनिट screen बंद ✔ सकाळी 5-10 मिनिट सूर्यप्रकाश

हे self-help नाही. हे autonomic reset आहे.

25+ वर्षांत मी पाहिलं आहे जेव्हा शरीर Repair Mode मध्ये जाऊ लागतं,

Sugar स्थिर होते. BP कमी fluctuation दाखवतो. झोप सुधारते.

शरीर तुमच्या विरोधात नाही. ते फक्त survival करतंय.

दिवसभरात तुम्ही जास्त वेळ कोणत्या mode मध्ये असता? ⚡ Stress 😌 Calm 🤯 कळत नाही

कमेंट करा.

#fight-mode#repair-mode#nervous-system#stress#fatigue#sleep#lifestyle#autonomic-reset
Share:WhatsAppXFacebook