Just For Hearts

Lifestyle

सगळं महत्त्वाचं असू शकत नाही : Essentialism

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

सगळं महत्त्वाचं असू शकत नाही : Essentialism

२५+ वर्षांच्या clinical practice मध्ये एक गोष्ट खूप स्पष्ट दिसली:

लोक आजारामुळे कमी थकतात... ते “सगळं सांभाळण्याच्या” प्रयत्नामुळे जास्त थकतात.

सगळीकडे लक्ष... पण स्वतःकडे नाही.

Essentialism या पुस्तकातील विचार आणि आत्तापर्यंत पाहिलेली माणसं यातून जाणवलेल्या काही शांत पण deep meaning गोष्टी:

१. “Busy” असणं म्हणजे meaningful जगणं नाही. दिवसभर धावपळ असते... पण रात्री झोपताना मन रिकामं आणि थकल्यासारखं वाटतं.

सगळं करणं म्हणजे योग्य जगणं नाही.

२. प्रत्येक “हो” मागे एका महत्त्वाच्या गोष्टीला “नाही” असतं.

Late night काम → झोपेला नाही फोनवर वेळ → स्वतःला नाही पैशासाठी धावपळ → शांततेला नाही

आयुष्य quietly हिशोब ठेवत असतं.

३. शरीर आधी हळू आवाजात बोलतं. थकवा... acidity... irritability... sleep disturbance...

हे signals असतात.

शरीर अचानक कोसळत नाही.

४. “स्वतःसाठी वेळ नाही” हे आता सर्वात common वाक्य झालंय. OPD मध्ये अनेकदा वाटतं लोक जगत कमी आहेत... manage जास्त करत आहेत.

५. कमी गोष्टी... पण पूर्ण लक्षाने. शांत जेवण नियमित चालणं पुरेशी झोप २–३ जवळची माणसं थोडा स्वतःसाठी वेळ

आयुष्याला खरंच एवढंच लागतं अनेकदा.

६. Decision fatigue (निर्णयांचा थकवा) खरंच असतो. दिवसभर छोटे छोटे decisions मन थकवत राहतात.

Routine मनाला शांत करतं.

७. “नाही” म्हणणं ही maturity आहे. प्रत्येक निमंत्रण, प्रत्येक discussion, प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणं आवश्यक नसतं.

स्वतःला जपणं म्हणजे selfishness नाही.

८. Health complicated नाही. आपण ते complicated करतो.

Sleep Walking Simple food Calm mind

शरीर basic गोष्टींवरच सर्वात चांगला प्रतिसाद देतं.

९. शांत माणूस अनेकदा strong असतो. सतत स्वतःला prove करणारे लोक आतून खूप थकलेले दिसतात.

स्थिरता हीसुद्धा ताकद असते.

१०. OPD मधला एक मोठा धडा: ज्यांनी आयुष्य simplify केलं... त्यांचं BP, sugar, stress हळूहळू stable होताना दिसलं.

औषधं तीच होती... पण जगण्याची पद्धत बदलली होती.

माझा अनुभव: आयुष्य सुधारण्यासाठी नेहमी “more” लागत नाही. कधी कधी काय कमी करायचं हे समजणं हेच खरं शहाणपण असतं.

तुमच्या आयुष्यात खरंच essential (अत्यावश्यक) काय आहे?

आणि उरलेलं... फक्त गोंधळ, धावपळ आणि थकवा तर नाही ना?

आज तुम्हाला सर्वात जास्त थकवतंय काय?

१. सततची धावपळ २. मनातला आवाज ३. सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न ४. आता थोडं simple जगायचं आहे

एक emoji किंवा एक शब्द लिहा.

कदाचित... आपल्यापैकी अनेकांना आयुष्य बदलायची नाही, फक्त थोडी शांत करण्याची गरज आहे.

Like ❤️ | Share | Follow

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

Follow 👉 Just for Hearts

Inspired by Essentialism by Greg McKeown, interpreted through २५+ वर्षांच्या clinical practice आणि life observations.

#essentialism#mindful-living#simple-living#mental-clarity#lifestyle-wisdom#just-for-hearts
Share:WhatsAppXFacebook