General Health
Reports normal असूनही Fatigue, Weight, Sugar का वाढते?
हा प्रश्न OPD मध्ये रोज ऐकायला मिळतो.
“Sir, Reports सगळे ठीक आहेत… तरीही Fatigue जाणवतो, Weight वाढतंय, Sugar नियंत्रणात राहत नाही.”
हे विरोधाभासी वाटतं… पण यामागे एक स्पष्ट कारण असतं.
Reports normal असूनही शरीर का साथ देत नाही?
1. Reports snapshot असतात, शरीर Process असतं. Report म्हणजे त्या क्षणाचं मोजमाप. Metabolism म्हणजे दिवसभर चालणारी Process. Process बिघडली असेल, तर Report काही काळ normal दिसू शकतो.
2. सुरुवातीचा Metabolic बिघाड Report मध्ये दिसत नाही. Insulin resistance, Fatty Liver ची सुरुवात, Muscle Sugar वापर कमी होणं हे सगळं आधी होतं, Report नंतर बदलतो. Report normal असणं म्हणजे Metabolism healthy असणं असे नाही.
3. शरीर Compensate करत असतं. सुरुवातीला शरीर extra Insulin, extra effort वापरून Balance ठेवतं. हा Compensation काळ संपला की Sugar, Weight, Fatigue स्पष्ट दिसायला लागतो.
4. Muscle चे काम कमी, Fat काम जास्त. Exercise नसले तरी Reports normal राहू शकतात. पण Muscles Sugar वापरत नसतील, Fat साठायला आणि Energy कमी वाटायला सुरुवात होते.
5. Sleep आणि Stress Reports मध्ये दिसत नाहीत. Poor Sleep आणि Chronic Stress Report मध्ये मोजले जात नाहीत. पण Metabolism बिघडवण्यात त्यांचा मोठा वाटा असतो.
6. जेवणाची वेळ आणि Pattern चुकीचा असतो. काय खातो यापेक्षा कधी आणि किती वेळा खातो याचा Metabolism वर जास्त परिणाम होतो.
7. दिवसभर बसणं = Silent Disruptor. Gym गेलो तरी उरलेले 10–12 तास बसून गेले, तर Metabolism मंदावतो. हा परिणाम Report लगेच दाखवत नाही.
8. Treatment Numbers वर, शरीरावर नाही. Sugar, BP, Cholesterol normal ठेवतो, पण Metabolism सुधारतोय का याकडे दुर्लक्ष होतं.
माझा अनुभव : Report normal असणं म्हणजे शरीर Optimal चालू आहे असं नेहमीच नसतं.
शरीर Fatigue, Weight, Sugar वाढवून आधीच इशारा देत असतं.
पुढच्या Post मध्ये आजकाल 40 च्या आधीच Metabolism का बिघडतोय?
तुमच्याही बाबतीत असं होतंय का Reports ठीक, पण शरीर साथ देत नाही? Comment मध्ये तुमचा अनुभव लिहा. चर्चा झाली की योग्य दिशा सापडते.
अशा वेळी ‘स्वतः प्रयत्न’ पुरेसे नसतात. समजून, Track करून, मार्गदर्शनात सुधारणा करावी लागते.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts