Mental Wellness
Breaking News बंद होत नाही, पण BP, Sugar आणि Anxiety का वाढते?
Breaking News बंद होत नाही, पण BP, Sugar, Anxiety वाढत जाते, का?
चला समजून घेऊयात:
1. मेंदू 24 x 7 बातम्यांसाठी बनलेला नाही. मानवी मेंदू धोका ओळखण्यासाठी तयार झाला आहे, सतत माहिती झेलण्यासाठी नाही.
2. प्रत्येक Breaking News = मेंदूसाठी “Alert”. मेंदू बातमी महत्त्वाची की नाही हे ठरवत नाही. तो सरळ Stress Mode ON करतो.
3. Stress Mode ON झाला की शरीरात काय होतं? Adrenaline आणि Cortisol वाढतात → BP वाढतो, Sugar अस्थिर होते, हृदय वेगाने धडधडतं.
4. झोप का बिघडते? मेंदू सतत जागा राहतो. “काहीतरी घडतंय” ही भावना झोप येऊ देत नाही.
5. Anxiety हळूच कशी वाढते? अति-माहिती + अनिश्चितता → मनाला नियंत्रण नसल्याची जाणीव → Anxiety वाढते.
6. शरीराला कळत नाही की हे फक्त बातम्या आहेत. शरीरासाठी धोका म्हणजे धोकाच असतो, खरा असो वा स्क्रीनवरचा.
7. माहिती असणं आणि अडकून राहणं वेगळं आहे. सजग राहणं आवश्यक आहे. पण सतत तणावात राहणं आवश्यक नाही.
8. आपली लोकशाही भक्कम पायावर उभी आहे. म्हणून सतत तणावात राहण्याची गरज नाही, शांत, समजूतदार नागरिकत्वच समाजाला पुढे नेतं.
9. OPD मधला साधा, Practical सल्ला: बातम्यांसाठी ठराविक वेळ ठेवा. रात्री उशिरा सततचे Alerts आणि चर्चा टाळा.
10. हे पलायन नाही. हे स्वतःच्या मेंदूची काळजी घेणं आहे. Self-control म्हणजेच Self-care.
आज जिथे मतदान होत आहे, तिथल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची आठवण: मतदान हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे. आज तो जाणीवपूर्वक, शांत मनाने आणि जबाबदारीने वापरणं महत्त्वाचं आहे.
तुमचा अनुभव काय सांगतो? सतत बातम्या पाहिल्यावर ताण वाढतो का? कमेंटमध्ये लिहा.
अशाच प्रश्नांवर Polls, चर्चा आणि Live संवाद Just For Hearts च्या YouTube community मध्ये नियमित असतात.
Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology)