Diabetes
Type 2 Diabetes साठी मला Insulin घ्यावं लागेल का?
Type 2 diabetes निदान झाल्यावर अनेक रुग्ण विचारतात, "डॉक्टर, मला Insulin घ्यावं लागेल का?"
महत्त्वाचं म्हणजे Type 2 Diabetes मध्ये सगळ्यांनाच insulin लागत नाही.
पण काही परिस्थितीत insulin हा योग्य आणि सुरक्षित उपचार असू शकतो.
1. निदानाच्या वेळी sugar खूप जास्त असणे
जर diagnosis वेळी: - HbA1c साधारण 10% किंवा जास्त - fasting किंवा जेवणानंतरची sugar खूप जास्त - जास्त तहान, वारंवार लघवी, वजन कमी होणे अशी लक्षणे
असतील तर कधी कधी काही काळासाठी insulin वापरून sugar पटकन कमी केली जाते.
Sugar control झाल्यावर अनेक रुग्ण tablets आणि lifestyle treatment वर पुढे जाऊ शकतात.
यामुळे glucose toxicity लवकर कमी होते.
2. Pancreas insulin कमी तयार करत असेल
Type 2 diabetes मध्ये कधी कधी β-cell function कमी झालेला असतो.
हे समजण्यासाठी मदत करणाऱ्या तपासण्या: - C-peptide - fasting insulin
हे कमी असल्यास tablets कमी परिणामकारक ठरू शकतात.
3. Tablets असूनही HbA1c control न होणे
Lifestyle आणि multiple oral medicines असूनही: - HbA1c सतत जास्त - fasting / post-meal sugars uncontrolled
असतील तर basal insulin add करणे हा guideline-supported step आहे.
4. Acute illness किंवा hospital admission
काही परिस्थितीत insulin temporary लागतो, उदा.: - infection - surgery - ICU admission
या काळात insulin fastest आणि controllable therapy असतो.
5. Pregnancy मध्ये diabetes
Pregnancy मध्ये अनेक oral medicines वापरणं मर्यादित असतं, म्हणून insulin preferred therapy असतो.
6. Steroid-मुळे वाढलेली sugar
Steroid औषधांमुळे blood sugar अचानक वाढू शकतो. या परिस्थितीत काही दिवस temporary insulin support लागतो.
7. Long duration diabetes
10–15 वर्षांनंतर काही रुग्णांमध्ये pancreas ची insulin production हळूहळू कमी होते.
अशा वेळी tablets पुरेशा राहत नाहीत आणि insulin add करणं clinically योग्य ठरू शकतं.
Type 2 diabetes मध्ये Insulin घ्यावे लागणे म्हणजे failure नाही. तो अनेकदा disease progression नुसार लागणारा treatment चा भाग असतो.
योग्य वेळी insulin वापरल्याने glucose toxicity कमी करून pancreas ला संरक्षण मिळू शकतं.
घरात किंवा मित्रांमध्ये diabetes असलेली व्यक्ती असेल तर हा माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts