Just For Hearts

Sleep

सकाळचा सूर्यप्रकाश = चांगली झोप

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

सकाळचा सूर्यप्रकाश = चांगली झोप

झोप सुधारण्यासाठी हा सर्वात सोपा, सुरक्षित आणि दुर्लक्षित उपाय आहे.

अनेकांचा समज आहे की, सकाळचा सूर्यप्रकाश म्हणजे फक्त Vitamin D.

सकाळचा सूर्यप्रकाश मेंदूवर नेमका काय परिणाम करतो?

1. Body Clock Reset होतो सकाळचा उजेड मेंदूला स्पष्ट संदेश देतो, "दिवस सुरू झाला." यामुळे शरीराचं घड्याळ (Circadian Rhythm) सरळ होतं.

2. Serotonin वाढतो (Stress relief hormone) सकाळचा प्रकाश मेंदूमध्ये Serotonin वाढवतो. Serotonin मुळे मन शांत राहतं, चिडचिड आणि Anxiety कमी होते.

3. Serotonin → Melatonin (Sleep hormone) दिवसा तयार झालेला Serotonin रात्री Melatonin बनवायला वापरला जातो. म्हणजे: सकाळचा प्रकाश = रात्रीची चांगली झोप. हे Pure Biology आहे, समजुती नाहीत.

मग 6–8 am चा च वेळ का सांगतो? कारण या वेळेत: • उजेड पुरेसा असतो • UVB महत्त्वाचा नसतो • मेंदूचा "Master Clock" योग्य प्रकारे Activate होतो

झोपेसाठी उजेड महत्त्वाचा आहे, Vitamin D नाही. (Vitamin D साठी वेळ वेगळी असते, 9 am am)

याचा अप्रत्यक्ष पण मोठा फायदा: झोप नीट झाली की: • Sugar Control सुधारतो • BP चे चढ-उतार कमी होतात • वजन, Fatigue, Mood यावर सकारात्मक परिणाम होतो

म्हणजे: झोप सुधारली = Metabolism सुधारतो.

कुणासाठी हे जास्त महत्त्वाचं? • Diabetes / BP असलेल्यांसाठी • ज्येष्ठांसाठी (झोप उलटी झालेली असते) • Stress, Fatigue, Weight Gain असलेल्यांसाठी • "Reports नॉर्मल पण काहीतरी बरोबर नाही" असं वाटणाऱ्यांसाठी

कसं करायचं? • सकाळी 6–8 वाजता • 15–20 मिनिटं • चालताना / बाल्कनीत / उघड्या जागेत • चष्मा न लावता, सुरक्षितपणे

लक्षात ठेवा: • हे Timing, Vitamin D साठी नाही, • हे झोप आणि Body Clock साठी आहे.

सकाळचा प्रकाश → रात्रीची चांगली झोप → निरोगी आयुष्य

Follow + Learn + Practice + Share = Stay Healthy

#morning-sunlight#better-sleep#sleep-health#circadian-rhythm#serotonin#melatonin#vitamin-d#lifestyle
Share:WhatsAppXFacebook