Lifestyle
Mitochondria : पेशींचे ऊर्जा निर्माण करणारे कारखाने
Inflammation series मध्ये आपण पाहिलं की अनेक lifestyle diseases च्या मागे chronic inflammation (सतत चालणारा दाह) असतो.
पण हा दाह सुरू होतो कुठून? त्याचं उत्तर मिळतं आपल्या शरीरातील पेशींमध्ये.
आणि तिथे भेटतात mitochondria.
Mitochondria म्हणजे काय?
Mitochondria म्हणजे पेशीतील energy factories (ऊर्जा निर्माण करणारे सूक्ष्म कारखाने).
जसं शहरात वीज निर्मिती केंद्र बंद पडलं तर संपूर्ण शहराचा वेग कमी होतो, तसंच mitochondria नीट काम करत नसतील तर शरीराची ऊर्जा निर्मिती कमी होते.
ऊर्जा कशी तयार होते?
आपण जे अन्न खातो त्यातून शरीराला मिळतात
• glucose (ग्लुकोज) • fatty acids (चरबीतील ऊर्जा घटक)
हे घटक mitochondria मध्ये जाऊन तयार करतात ATP - शरीराचं ऊर्जा चलन.
याच ऊर्जेवर चालतात हृदय, मेंदू, स्नायू आणि शरीरातील प्रत्येक पेशी.
एक महत्त्वाची गोष्ट ज्या अवयवांना जास्त ऊर्जा लागते तिथे mitochondria सुद्धा जास्त असतात. विशेषतः हृदय, मेंदू आणि स्नायू.
मग inflammation शी संबंध काय?
जेव्हा mitochondria नीट काम करत नाहीत
→ ऊर्जा निर्मिती कमी होते → oxidative stress (ऑक्सिडेटिव्ह ताण) - पेशींवर पडणारा रासायनिक ताण / पेशींना होणारी ऑक्सिजन-संबंधित हानी वाढते → शरीरात inflammatory signals (दाह संकेत) वाढतात
म्हणजेच mitochondria बिघडले की दाह प्रक्रिया सुरू होऊ शकते.
OPD मध्ये दिसणारी गोष्ट
काही लोक सांगतात “डॉक्टर, थकवा खूप येतो पण reports जवळजवळ normal आहेत.”
अशा वेळी अनेकदा समस्या शरीराच्या energy system मध्ये असू शकते.
आजच्या जीवनशैलीचा परिणाम
• शारीरिक हालचाल कमी • प्रक्रिया केलेला आहार • जास्त साखर • झोपेचा अभाव • सततचा ताण
हळूहळू यामुळे mitochondria कमकुवत होतात आणि chronic inflammation वाढू शकतो.
दाह / Inflammation समजून घ्यायचा असेल तर पेशींची ऊर्जा समजून घ्यावी लागते.
अशी शरीराच्या आत काय चालतं याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी असं तुम्हाला वाटतं का?
👍 हो, नक्की 🙂 उपयुक्त माहिती 📚 पुढील पोस्टची वाट पाहतो
जर असं वाटत असेल तर आपल्या मित्र-परिवाराला जरूर tag करा आणि त्यांनाही हा page follow करायला सांगा.
आरोग्याविषयी अशा science-based चर्चा सहसा होत नाहीत.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts