Just For Hearts

General Health

65 वर्षांचे गृहस्थ OPD मध्ये: फक्त Medicine पेक्षा जास्त

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

65 वर्षांचे गृहस्थ OPD मध्ये आले होते. त्यांना Heart failure आहे आणि Diabetes आहे. ते Medicine नियमित घेत आहेत. ते Pensioner आहेत आणि Financially stable आहेत.

त्यांची पत्नी काही महिन्यांपूर्वी brain haemorrhage मुळे गेली.

गेल्या सहा महिन्यांपासून, कधी एका मुलाकडे, कधी दुसऱ्या मुलाकडे, जणू आयुष्य 'rotation' वर चालू आहे. न बोलता येणाऱ्या घरातल्या वातावरणाने ते त्रस्त होते.

आज त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच होतं. थकवा नाही, आजाराचं दुःखही नाही. काहीतरी आत खोलवर अडकलेलं होतं.

मी विषय काढला नाही. काही गोष्टी, रुग्णच सांगतो.

जाताना ते थांबले.

“Sir, आता अहिल्यानगरला shift होतोय. तीन महिन्यांत एकदा येईन. एक विनंती आहे…

सकाळच्या जेवणाशी संबंधित Medicine देऊ नका. मला रोज breakfast शक्य होत नाही. आणि झोपेसाठी Medicine द्या…

मी आता एकटाच राहणार आहे.” ते बोलत होते, पण डोळे काहीतरी वेगळंच सांगत होते.

त्या क्षणी मला कळलं की आज Medicine बदलून काही होणार नाही.

कारण sugar आणि Heart failure reports मुळे बिघडत नाहीत. ते routine तुटल्यावर, एकटेपण वाढल्यावर, आणि स्वीकार न झालेल्या वास्तवामुळे बिघडतात.

मी त्यांच्याशी थोडा वेळ बोललो. Prescription पेक्षा जास्त.

आणि मनात एक चित्र खूप स्पष्ट होत गेलं:

काही वर्षांनी ICU. Sugar नियंत्रणाबाहेर. Heart failure वाढलेलं.

तेव्हा दोन्ही मुलं, सुना बाहेर उभ्या राहून खूप काळजीवाहू चेहऱ्यांनी म्हणतील,

“Doctor, हे तर नियमित OPD ला येत होते… Medicine घेत होते… आम्ही सगळं केलं होतं…”

आणि आत बेडवर एक शरीर असेल जे Medicine नी टिकवलं गेलं, पण आयुष्याने हळूहळू सोडून दिलं गेलं.

आजारी शरीरापेक्षा एकटं मन जास्त वेगाने आजार वाढवतं.

हा किस्सा वेगळा नाही. खूप घरांमध्ये चालू आहे, फक्त शांतपणे.

हे अजूनही टाळता येऊ शकतं… जर त्यांनी आयुष्य जसं आहे तसं स्वीकारून, उरलेल्या दिवसांना एखाद्या छोट्या purpose किंवा hobby शी जोडायला शिकले तर.

#elderly-care#loneliness#heart-failure#diabetes#mental-wellness#chronic-illness#patient-story#emotional-health
Share:WhatsAppXFacebook