Blood Pressure
BP ची गोळी एकदा सुरू केली की आयुष्यभर घ्यावी लागते का?
"सर, BP ची गोळी एकदा सुरू केली की आयुष्यभर घ्यावी लागते का?"
हा प्रश्न मी गेली अनेक वर्षं रोज ऐकतो.
खरं सांगायचं तर, लोक BP औषधांना घाबरतात, पण uncontrolled BP ला नाही, जो मेंदू, heart आणि kidney ला हळूहळू नुकसान करतो.
चला, समजून घेऊयात:
1. BP हा आजार नाही; तो दीर्घकालीन धोका (Risk Marker) आहे.
BP वाढलेला असेल तर brain, heart, kidney वर हळूहळू परिणाम होतो. उद्दिष्ट: आज BP कमी करणं नाही, पुढील 10–20 वर्षांचं संरक्षण.
2. Lifestyle first - कधीही घाईत औषध सुरू करू नका.
जर BP 140–159/90–99 (Stage I) असेल आणि high-risk नसेल, 👉 6–12 आठवड्यांचा structured lifestyle modification trial / जीवनशैलीतील बहल व्यायाम ह्यावर भर द्या.
नक्की काय बदल करायचा? Optimum lifestyle targets: • मीठ < 5 g/day • वजन 5–7% घट • आठवड्याला 150 min brisk walk • Alcohol मर्यादा, sleep 7–8 तास (ACC/AHA, ESC Guidelines)
3. कधी औषध तात्काळ आवश्यक?
BP ≥160/100, किंवा diabetes, CKD, CAD, stroke history, symptoms असल्यास 👉 औषध delay न करता सुरू (lifestyle सोबत).
4. औषधांचा परिणाम कधी दिसतो?
• Initial effect: 5–7 दिवसात सुरू • Stable control: 2–4 आठवडे मध्ये पूर्ण control 👉 म्हणूनच वारंवार बदल करू नका; trend पाहा.
5. Dose नेहमी low-dose पासूनच
Guidelines प्रमाणे low dose start → response assess → titration. High dose सुरुवात क्वचितच.
6. Lifestyle सुधारला तर dose कमी होऊ शकतो
डेटा स्पष्ट आहे: • वजन 5–7 kg ↓ → SBP 5–10 mmHg ↓ • मीठ कमी → SBP 4–6 mmHg ↓ • नियमित चाल → SBP 5–8 mmHg ↓ 👉 या सुधारण्यांमुळे dose reduction शक्य.
7. BP औषध बंद कधी करता येतं?
खालील सर्व अटी पूर्ण असतील तर • BP <130/80 किमान 6–12 महिने • lifestyle targets सतत पाळलेले • weight stable, alcohol/sleep controlled • home BP trends stable
👉 doctor-supervised tapering करून औषध बंद करता येऊ शकतं.
(Abrupt stopping / अचानक बंद नको ❌ , rebound BP चा धोका)
8. BP रोज नाही; Morning trend महत्वाचा
एक reading नव्हे तर 👉 7–10 दिवसांचा morning BP trend decision ठरवतो.
9. एक औषध पुरेसं नसेल तर?
2–4 आठवडे प्रतीक्षा → dose वाढवा किंवा दुसरं औषध add करा हे stepwise, guideline-driven असतं; घाई नाही.
10. Bottom line
• Lifestyle = foundation • Medicines = protection • Dose adjust/stop = body allows तेव्हा • Self-stop = धोकादायक
योग्य सवयी सातत्याने पाळल्या, तर dose कमी होऊ शकतो, कधी कधी औषध बंदही होऊ शकतं, पण डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली.
तुम्हाला BP आहे का? औषध सुरू करायची भीती वाटते का?
कमेंटमध्ये लिहा 👉 BP किती range मध्ये आहे? 👉 Lifestyle बदल काय सुरू आहेत?
योग्य वेळी योग्य निर्णय = आयुष्यभराचा फायदा.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts