Just For Hearts

Blood Pressure

तुमचं BP machine खोटं reading देतंय का?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

"तुमचं BP machine खोटं reading देतंय का?"

OPD मध्ये हा प्रश्न खूप common झाला आहे.

अनेक patients म्हणतात, "Sir, माझं BP घरच्या घरी normal असतं पण clinic मध्ये वाढतं," किंवा "Machine रोज वेगळं BP दाखवतं."

अनेक वेळा machine चुकीचं नसतं; measurement technique चुकीची असते.

1. BP हा स्थिर number नाही; तो बदलू शकतो: - Stress मुळे - झोप कमी असल्यामुळे - Anxiety मुळे - Pain मुळे - चहा/coffee मुळे - Physical activity मुळे

म्हणून single reading पेक्षा trends जास्त महत्त्वाचे असतात.

2. BP घेण्याची पद्धत खूप महत्त्वाची आहे: - BP घेण्याआधी ५ मिनिट शांत बसा - हात heart level मध्ये ठेवा - बोलू नका - लगेच चालून आल्यावर BP घेऊ नका - चहा/coffee नंतर लगेच reading घेऊ नका

जर technique चुकीची असेल तर machine चुकीचं वाटू शकतं.

3. कोणतं BP machine वापरावं? अनेक लोक हा प्रश्न विचारतात. माझ्या मते: - Upper arm automatic BP monitor अधिक reliable असतो - हाताला लावायचा cuff size योग्य असणं महत्त्वाचं आहे - Validated आणि विश्वासार्ह company ची निवड करा

Wrist BP machines काही वेळा inaccurate readings देऊ शकतात.

4. काही लोकांचं BP फक्त clinic मध्ये वाढतं. याला White Coat Hypertension म्हणतात. काही लोकांचं clinic मध्ये BP normal पण घरच्या घरी जास्त असतं. याला Masked Hypertension म्हणतात. हे अनेक वेळा दुर्लक्षित राहतं.

5. मग home BP monitoring उपयोगी आहे का? खूप उपयोगी आहे कारण: - patterns दिसतात - treatment response समजतो - lifestyle चा परिणाम कळतो - patients health बद्दल अधिक aware होतात

म्हणून अनेक patients आता BP remotely track करत आहेत.

Just For Hearts Program मध्येही अनेक लोक नियमित BP, pulse, sleep आणि lifestyle tracking करत आहेत.

कारण future healthcare फक्त hospital visit वर नाही तर continuous monitoring आणि timely action वर आधारित आहे.

BP हा फक्त number नाही; तो शरीराच्या आत चाललेल्या stress, lifestyle आणि रक्तवाहिन्यांच्या health चा signal असू शकतो.

तुमच्या घरी BP machine आहे का? तुम्ही BP किती regularly check करता?

हा post अशा व्यक्तीला नक्की share करा ज्यांच्या घरी BP machine आहे पण कदाचित योग्य पद्धतीने वापरलं जात नाही.

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#blood-pressure#bp-monitoring#heart-health#home-monitoring#white-coat-hypertension#masked-hypertension
Share:WhatsAppXFacebook