Just For Hearts

Heart Health

Smart Watch खरंच उपयोगी आहे का? ⌚

Just For Hearts3 मिनिटांचे वाचन

Smart Watch खरंच उपयोगी आहे का? ⌚

आजकाल OPD मध्ये एक नवीन बदल दिसतो.

पूर्वी patients reports घेऊन यायचे. आता अनेकजण watch मधले screenshots घेऊन येतात.

Heart rate. Sleep score. Stress score. Steps. Calories. ECG alert.

Data खूप वाढलाय … पण आरोग्य फक्त data ने समजत नाही. आरोग्य pattern, context आणि योग्य interpretation ने समजतं.

1. Smart watch चा पहिला फायदा म्हणजे awareness.

अनेक लोकांना वाटतं, “मी दिवसभर active असतो.”

पण watch सांगतं की movement कमी आहे, sitting जास्त आहे आणि दिवसाचे actual steps अपेक्षेपेक्षा खूप कमी आहेत.

ही जाणीव महत्त्वाची आहे. कारण lifestyle change सुरू होण्यापूर्वी awareness / जाणिव सुरू झाली पाहिजे.

2. Heart rate trends useful ठरू शकतात.

Resting heart rate सतत वाढलेला दिसत असेल, तर तो फक्त heart चा विषय नसतो.

Poor sleep, stress, infection, dehydration, low fitness, excess caffeine किंवा काही वेळा rhythm disturbance यामागे असू शकतात.

फक्त एक reading महत्त्वाची नसते. Trend महत्त्वाचा असतो.

3. Sleep tracking अनेकांना reality check देऊ शकतं.

“मी ७ तास झोपतो” आणि “माझी झोप खरंच restorative / पुर्ण आहे” यात फरक असतो.

Irregular sleep, frequent awakenings आणि poor recovery यांचा BP, sugar, weight, mood आणि heart health वर परिणाम होऊ शकतो.

4. Exercise response शरीराची capacity दाखवू शकतो.

Walking किंवा exercise नंतर heart rate खूप वाढत असेल किंवा कमी व्हायला वेळ लागत असेल, तर fitness, recovery आणि metabolic health बद्दल संकेत मिळू शकतात.

ही माहिती panic करण्यासाठी नाही. ती सुधारणा सुरू करण्यासाठी आहे.

5. Irregular rhythm alerts काही लोकांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात.

Palpitations, चक्कर, unexplained fatigue, breathlessness किंवा older age group मध्ये irregular pulse alerts दुर्लक्ष करण्यासारखे नसतात.

काही वेळा atrial fibrillation सारखे rhythm problems लवकर लक्षात येऊ शकतात.

पण alert म्हणजे final diagnosis नाही. तो पुढे तपासणीची गरज सांगणारा signal असतो.

6. Smart watch कुठे कमी पडतं?

हे समजणं खूप महत्त्वाचं आहे.

Normal watch reading म्हणजे heart disease नाहीच असं नाही.

Smart watch प्रत्येक heart attack आधी पकडेलच असं नाही.

Stress score म्हणजे शरीरातील physiological signals चं indirect estimation असतं final diagnosis नाही.

Sleep score म्हणजे complete sleep study नाही.

ECG feature असलं तरी clinical ECG आणि doctor interpretation ची जागा ते घेत नाही.

काही वेळा watch आधी बदल दाखवतं… आणि काही वेळा symptoms आधी येतात. दोन्हींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

7. मग smart watch घ्यावं का?

माझं उत्तर सरळ आहे.

जर तुम्ही ते fashion साठी घेत असाल, तर ते gadget आहे.

जर तुम्ही ते awareness, discipline, tracking आणि timely medical discussion साठी वापरत असाल, तर ते health tool आहे.

फरक device मध्ये नाही. फरक वापरणाऱ्याच्या दृष्टिकोनात आहे.

8. Future healthcare कसं दिसणार आहे?

पुढच्या काळात healthcare फक्त clinic किंवा hospital मध्ये मर्यादित राहणार नाही.

Home monitoring, wearable tracking, AI-assisted analysis, remote expert guidance आणि lifestyle pattern review हे सगळं routine होणार आहे.

Doctor कडे जाण्यापूर्वी patient कडे स्वतःच्या शरीराचा data असेल.

पण त्या data ला अर्थ देण्यासाठी clinical wisdom लागणारच.

Technology numbers देते. Doctor context देतो. आणि patient action घेतो.

Healthcare episodic राहणार नाही… ते continuous understanding आणि monitoring कडे जात आहे.

हीच smart healthcare ची खरी सुरुवात आहे.

तुम्ही smart watch वापरता का? त्यातून तुम्हाला खरंच कोणती गोष्ट useful वाटली?

हा post अशा व्यक्तीला share करा जी smart watch वापरते… पण त्याचा health अर्थ अजून समजून घ्यायचा आहे 🙂

Dr Ravindra L Kulkarni , MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#smart-watch#heart-rate#sleep-tracking#health-awareness#ecg-alerts#lifestyle#health-monitoring
Share:WhatsAppXFacebook