Diabetes
CGM महाग आहे तरीही खरंच गरजेचं का? २५ वर्षांचा अनुभव
"CGM महाग आहे... पण खरंच गरजेचं कोणाला?" हा रोज विचारला जाणारा प्रश्न आहे.
२५ वर्षांचा अनुभव सांगतो की योग्य व्यक्तीला CGM लावल्यास त्याचा औषधाइतकामोठा परिणाम होतो.
CGM म्हणजे काय?
CGM हा हातावर लावला जाणारा छोटा सेन्सर आहे जो २४ तास sugar levels मोजतो आणि मोबाईलमध्ये ग्राफ दाखवतो. Freestyle Libre, Libre Pro, आणि Dexcom G6–G7 हे सर्वाधिक वापरले जाणारे उपकरणे आहेत. किंमत ₹२,५०० ते ₹४,००० (१०–१४ दिवसांसाठी) आहे.
CGM नेमकं कोणाला सर्वात जास्त फायदा होतो? (प्रत्येक मुद्दा प्रॅक्टिसमध्ये शंभरदा पाहिलेला आहे)
१) HBA1C "ठीक" असूनही दिवसात sugar खूप बदलणारे रुग्ण CGM hidden spikes पकडतो, जे HBA1C मध्ये कधीच दिसत नाहीत (ADA २०२४).
२) सतत Hypo होणारे किंवा "हायपो कळत नाही" अशी तक्रार असलेले CGM अलार्म जीव वाचवू शकतात.
३) इन्सुलिन घेणारे रुग्ण Meal timing, dose adjustment, आणि carb counting सगळं डेटा आधारित असतं.
४) Weight loss / Diabetes reversal करणारे कोणत्या अन्नानं spike होतो; कोणत्या व्यायामानं control होतो - CGM सर्वात चांगलं शिक्षण देतो.
५) Shift / Night duty करणारे Sleep rhythm बिघडल्यावर sugar पॅटर्न खूप बदलतात, CGM हेच दाखवतो.
६) ज्यांना SMBG (बोट टोचणं) करण्यास त्रास होतो CGM खूप कमी वेदनादायक आणि अधिक माहितीपूर्ण आहे.
७) सुरुवातीच्या stages मधील Type 2 रुग्ण Lifestyle बदल शिकण्यासाठी CGM पेक्षा चांगला शिक्षक नाही.
CGM vs SMBG (Self monitoring)
SMBG म्हणजे दिवसात २–४ वेळा "photo" घेणे. CGM म्हणजे २४ तास सतत "video" - त्यामुळे treatment decisions अधिक अचूक होतात.
सगळ्यात महत्वाचं: फक्त CGM लावणं पुरेसं नाही. अनेक रुग्ण CGM लावतात पण डेटा कसा वाचायचा हे माहित नसतं. Diabetes Educator आणि Doctor यांचं योग्य मार्गदर्शन मिळालं तरच CGM खऱ्या अर्थानं फायदेशीर ठरतो.
CGM लावण्यापूर्वी किंवा नंतर योग्य मार्गदर्शन हवं असल्यास Comment मध्ये प्रश्न विचारा.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts