Just For Hearts

Lifestyle

Intermittent Fasting (IF) आणि Metabolism: एक सविस्तर मार्गदर्शक

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

"उपाशी राहणं" नाही… Rhythm सुधारण्याची पद्धत. Intermittent Fasting (IF) म्हणजे structured timing.

1. IF म्हणजे नेमकं काय? Intermittent Fasting म्हणजे दिवसभर उपाशी राहणं नाही. तो “Time Restricted Eating” आहे, जेवणाची वेळ मर्यादित ठेवणे. उदा. 12–14 तास रात्रीचा Fasting gap.

2. सतत खाणं = सतत Insulin दर 2–3 तासांनी खाल्लं तर Insulin वारंवार वाढतो. Fasting window वाढला की Insulin ला खाली येण्याची संधी मिळते. यामुळे Insulin sensitivity सुधारू शकते.

3. Fat वापरण्याची क्षमता वाढते Fasting दरम्यान शरीर stored Fat वापरायला शिकतं. हे crash diet नाही. ही Metabolic flexibility आहे.

4. Research काय सांगतं? Early time-restricted eating अभ्यासांमध्ये Insulin sensitivity, BP आणि Abdominal fat markers सुधारलेले दिसले आहेत. IF science-backed आहे, fad नाही. पण योग्य पद्धतीने.

5. सुरुवात कशी करावी? ❌ थेट 16–18 तासांनी सुरुवात करू नका. ✔ Late-night snacking बंद करा. ✔ Dinner 8 पूर्वी. ✔ 12 तास gap ठेवा (8 pm – 8 am). ✔ नंतर 13–14 तास. सोपं. टिकाऊ. सुरक्षित.

6. कोणाला जास्त उपयोगी? ✔ Prediabetes ✔ Borderline BP ✔ Fatty Liver ✔ Sedentary lifestyle Structured IF Metabolic load कमी करण्यात मदत करू शकतो.

7. कोणाला टाळावं? ❌ Pregnant / Lactating ❌ Type 1 Diabetes ❌ Severe Underweight ❌ Eating Disorder history

8. Diabetes / BP औषध घेत असाल तर? Fasting सुरू करण्यापूर्वी Treating Physician शी चर्चा आवश्यक. औषध चालू असताना Hypoglycemia किंवा BP drop होऊ शकतो.

9. IF ≠ Junk in Window जर eating window मध्ये processed, sugar-heavy आहार असेल तर फायदा कमी होतो. Timing + Quality = परिणाम.

10. माझे मत IF म्हणजे शिक्षा नाही. तो Circadian alignment आहे. Metabolism intensity वर नाही consistency वर चालतो. सुरुवात लहान करा. सातत्य ठेवा. Monitor करा. तुम्ही 12–14 तासांचा Fasting gap ठेवू शकता का? हो प्रयत्न सुरू अजून नाही

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#intermittent-fasting#metabolism#time-restricted-eating#insulin-sensitivity#fat-loss#prediabetes#lifestyle-medicine#metabolic-health
Share:WhatsAppXFacebook