Diabetes
HbA1C Normal असल्याचा अर्थ Diabetes Control आहे, असा मोठा गैरसमज
तुमचं HbA1C 6.5 आहे, पण दिवसात तुमची साखर 200–250 पर्यंत जाते तर 'Normal' HbA1C किती उपयुक्त आहे?
HbA1C म्हणजे मागील ३ महिन्यांची सरासरी साखर, पण सरासरी नेहमी सत्य दाखवत नाही.
HbA1C कधी पूर्णपणे फेल होतो?
- अॅनिमिया किंवा B12 कमी - CKD किंवा डायालिसिस - गर्भावस्था - hemoglobin variants - वारंवार sugar highs आणि lows - नुकताच रक्तस्राव किंवा transfusion
या परिस्थितींमध्ये HbA1C तुमच्या control पेक्षा चांगला किंवा वाईट दिसू शकतो.
Diabetics साठी महत्त्वाचा मुद्दा:
HbA1C Normal = Diabetes Control होत आहे, असा सरळ अर्थ नाही. हा गैरसमज complication वाढण्याचं मुख्य कारण आहे.
तर मग पर्याय कोणते?
1) Fructosamine - फक्त २–३ आठवड्यांचा report, lifestyle किंवा औषधांचा तात्काळ परिणाम दिसतो. - Pregnancy आणि anemia मध्ये अधिक accurate.
2) Glycated Albumin - Short-term control दर्शवतो. - irregular eating किंवा sugar swings असणाऱ्यांसाठी महत्त्वाचा.
3) CGM (Continuous Glucose Monitoring) - दिवसातील 200+ readings. - Time-in-Range = सर्वात अचूक मीटर. - Diabetes reversal programs मध्ये सर्वाधिक वापरला जाणारा gold tool.
4) Home Monitoring (SMBG) - आहार, औषध आणि activity चा थेट परिणाम दिसतो. - Diabetes reversal साठी foundation tool.
Indian Guidelines (RSSDI 2024):
- HbA1C महत्त्वाचा आहे पण एकटाच पुरेसा नाही. - अचूक परिणाम न मिळणाऱ्या केसेसमध्ये Fructosamine किंवा CGM सुचवलेले. - Clinical picture आणि sugar pattern हाच खरा decision-maker.
तुमचं HbA1C normal असूनही sugar uncontrolled जातं का?
डॉक्टरांनी कधी सांगितलंय का की "तुमची साखर दिवसभर dangerously fluctuate होते"?
कमेंटमध्ये तुमचा अनुभव लिहा, आपण त्यावर चर्चा करू.
हा पोस्ट HbA1C Normal असल्याचा भ्रम असलेल्या प्रत्येक कुटुंबात पोचवा. तुमचा एक share एखाद्याला complication पासून वाचवू शकतो.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts