Just For Hearts

Heart Health

हाताची पकड (Handgrip) - फक्त ताकद नाही, तुमच्या हृदयाचंही संकेत

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

1 लिटर पाण्याची बाटली किंवा छोटा डंबेल घ्या. शक्य तितक्या घट्ट पकडा. 10 सेकंद धरून ठेवा. दोन्ही हातांनी करा आणि तुलना करा.

परिणाम समजून घ्या: - 10 सेकंद सहज धरू शकणे → चांगली muscle strength - 5–10 सेकंदात थकवा जाणवणे → सुधारणा हवी - 5 सेकंदही कठीण जाणवणे → लक्ष देण्याची गरज

Grip strength म्हणजे muscle strength, metabolism आणि vascular health यांचा संकेत. कमकुवत grip strength म्हणजे heart attack, stroke आणि mortality चा जास्त धोका (Lancet, PURE study).

म्हणजे ही फक्त हाताची ताकद नाही, तर तुमच्या शरीराच्या reserve capacity चा अंदाज आहे.

OPD मध्ये दिसते की ज्यांची grip strength कमी असते, त्यांच्यात fatigue, sugar fluctuation आणि functional decline जास्त आढळतो.

आपण सहसा BP आणि sugar यांसारखे numbers बघतो, पण शरीराची capacity मोजत नाही.

Grip strength फक्त muscle नाही, तर heart आणि metabolic health चा प्रतिबिंब आहे. कमकुवत grip strength म्हणजे heart disease आणि mortality चा जास्त धोका.

आजच करून बघा, मोजा, अंदाज लावू नका.

तुमचा वेळ (seconds) comment मध्ये लिहा. दोन्ही हातांमध्ये फरक आहे का तेही सांगा.

हा post घरच्यांना share करा; ही छोटी test मोठं चित्र दाखवते.

हे उपयुक्त वाटल्यास ❤️ करा आणि ज्यांना उपयोगी पडेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#handgrip#heart-health#muscle-strength#metabolic-health#vascular-health#heart-disease-risk
Share:WhatsAppXFacebook