Heart Health
Fatty Liver → Diabetes → Heart Disease: हा प्रवास कसा सुरू होतो?
(या विषयावर 3 पोस्टची मालिका - भाग 3)
1. Fatty Liver म्हणजे Liver Insulin Resistant झालेला असतो. म्हणजे Insulin असूनही Liver Glucose तयार करत राहतो.
2. सुरुवातीला Fasting Sugar Normal दिसते. पण Post-meal Sugar (जेवणानंतरची Sugar) हळूहळू वाढू लागते.
3. हाच Stage म्हणजे Prediabetes. जिथे Report अजून “ठीक” असतात पण Disease Process सुरू झालेली असते.
4. Liver Fat वाढल्यावर VLDL (वाईट Cholesterol Particles) वाढतात → Triglycerides वाढतात, HDL कमी होतं.
5. ही Lipid Pattern हृदयाच्या Blood Vessels साठी सगळ्यात जास्त धोकादायक मानली जाते.
6. म्हणून Fatty Liver असलेला रुग्ण “फक्त Liver चा” नसतो. तो Future Cardiac Risk मध्ये असू शकतो.
7. ही सगळी प्रक्रिया वर्षानुवर्षे शांतपणे चालते. म्हणून Symptoms उशिरा दिसतात.
8. चांगली बातमी: Fatty Liver मध्ये Cells मरत नाहीत त्या Overload झालेल्या असतात. म्हणून योग्य बदल केल्यास 8–12 आठवड्यांत Metabolic सुधारणा सुरू होते (Ultrasound बदलायला जास्त वेळ लागू शकतो).
आजपासून स्वतःसाठी इतकंच ठरवा: * जेवणाची वेळ रोज साधारण एकसारखी * जेवणानंतर थोडी हालचाल * झोपेची वेळ आणि कालावधी नीट * सतत बसून राहणं कमी हे छोटे Self-care बदलच Insulin Sensitivity सुधारण्याची सुरुवात करतात.
या 3 पोस्ट वाचताना जे प्रश्न पडले “माझ्या बाबतीत हे किती लागू आहे?” “मी नेमकं काय, किती काळ करायचं?” ते Comment मध्ये नक्की विचारा.
उद्या गुरुवारी YouTube Live मध्ये हे सगळं शांतपणे, विज्ञानाच्या आधारावर Mechanisms, Timelines आणि Practical Clarity सह घेणार आहोत. YouTube Live ची वेळ व Channel Details Evening पर्यंत Update केली जातील.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts